Full Width(True/False)

कोण ठरणार इंडियन आयडलचा विजेता? १२ तास चालणार ग्रँड फिनाले

मुंबई : 'इंडियन आयडल १२' हा कार्यक्रम विविध कारणांवरून कधी वादाच्या भोव-यात अडकला होता. कधी हा वाद स्पर्धकांवरून, कधी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकावरून तर कधी परीक्षकांवरून होता. या सर्व वादांमधून तालावून सुलाखून हा कार्यक्रम अंतीम टप्प्यात आला आहे. इंडियन आयडल कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. हा ग्रँड फिनालेचा कार्यक्रम तब्बल १२ तासांचा असणार आहे. कार्यक्रमाच्या अंतीम फेरीमध्ये अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन, शनमुखाप्रिया, सायली कांबळे आणि निहाल यांच्यात चुरस रंगणार आहे. इंडियन आयडल १२ चा ग्रँड फिनाले भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी निर्मात्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. प्रेक्षकांनी हा ग्रँड फिनाले बघावा यासाठी वेगवेगळी आकर्षणे निर्माते कार्यक्रमात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाच्या क्रिएटिव्ह टीम ग्रँड फिनालेच्या तयारीत व्यग्र झाले आहेत. ग्रँड फिनालेसाठी सेलिब्रिटींना बोलवण्यात येणार आहेच. याशिवाय याआधी इंडियन आयडलच्या आधीच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून ग्रँड फिनालेबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु अंतीम स्पर्धा अधिक रंजक करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही हे नक्की. सर्वात वादग्रस्त पर्व इंडियन आयडल कार्यक्रमातील १२ वे पर्व हे आतापर्यंत सर्वात वादग्रस्त पर्व ठरले आहे. कधी या कार्यक्रमातील परीक्षकांवरून हा वाद निर्माण झाला. तर कधी कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यामुळे वादाच्या भोव-यात अडकला. ‘इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी मला कार्यक्रमात सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते...’ अशी टीका अमित कुमार यांनी या कार्यक्रमाव केली होती. त्यामुळे मनोरंजन विश्वामध्ये एकच खळबळ उडाली होती. या वादानंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि परीक्षक मुंतशीर यांनी कार्यक्रमाच्या बाजूने मत व्यक्त केले होते. या वादांबरोबरच कार्यक्रमातील स्पर्धकांची हालाखीची परिस्थिती, त्यांच्या दुःखाचे भांडवल करत तर कधी दोन स्पर्धकांमध्ये काही तरी अफेअर सुरू आहे असे सांगत कार्यक्रमाची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला होता. यावरूनही सोशल मीडियावर या कार्यक्रमावर आणि त्याच्या निर्मात्यांवर टीका झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TgAiNm