मुंबई : अभिनेत्री आणि अभिनेता यांच्यातील नाते आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळेच ते आपले एकमेकांवर किती प्रेम आहे,हे दाखवण्याची एकही संधी दवडत नाही. सातत्याने हे दोघेजण एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असता. या फोटोंमधून त्यांच्यातील बाँडिंग दिसते. अलिकडेच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. खरे तर हा मिरर सेल्फी आहे. त्यात ती जरी एकटी दिसत असली तरी रणबीरबद्दलचे तिचे प्रेम तिने व्यक्त केले आहे. आलियाने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वर्कआऊट करतानाचा एक मिरर सेल्फी काढून प पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्या फोनच्या कव्हरवर इंग्रजीमधील 8 हा आकडा लिहिलेला दिसत आहे. या आकड्याच्या बाजूला हार्टचा एक इमोजी दिसत आहे. 8 हा आकडा रणबीर कपूरचा आवडता आणि लकी आकडा असल्याचे सर्वश्रुत आहे. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले आहे '२० दिवस पूर्ण झाले आहेत आता २० दिवस बाकी आहेत...' आलियाने ४० दिवसांचे फिटनेस चँलेंज स्वीकारले आहे. हे चँलेज स्वीकारल्यानंतर वर्कआऊट करताना तिने मिरर सेल्फी काढला आहे आणि हा फोटो तिने इ्न्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आलियाच्या कामाबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात आलियासोबत रणबीर दिसणार आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एका सिनेमात काम केले आहे. या सिनेमात आरआरआर, गंगूबाई काठियावाडी, तख्त, रॉकी और रानी या सिनेमांत दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36FZyjn