Full Width(True/False)

मोठा झटका! या कंपनीने स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत केली तब्बल ७ हजार रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किंमती वाढताना दिसत असून, गेल्या महिन्यात शाओमीने आपल्या स्मार्ट टीव्हीच्या किंमती वाढवल्या होत्या. आता ने आपल्या टीव्हींच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वनप्लसने कमी किंमतीच्या टीव्हींमध्ये देखील वाढ केली असून, कंपनीने जवळपास ७ हजार रुपये वाढ केली आहे. वनप्लसचे कोणते टीव्ही महाग झाले आहेत पाहुयात. OnePlus चे हे टीव्ही झाले महाग कंपनीने दोन लाइनअपमध्ये वाढ केली आहे. यात आणि सीरिजचा समावेश आहे.
  • कंपनीने स्वस्त टीव्ही ची किंमत २,५०० रुपयांनी वाढवली आहे. टीव्हीची किंमत आधी १६,४९९ रुपये होती, जी आता १८,९९९ रुपये झाली आहे.
  • OnePlus TV40Y1 ची किंमत २३,९९९ रुपयांवरून २६,४९९ रुपये झाली आहे.
  • OnePlus TV43Y1 ची किंमत २६,९९९ रुपयांवरून २९,४९९ रुपये झाली आहे. टीव्हीच्या किंमतीत २,५०० रुपयांनी वाढ झाली.
  • यासोबतच, Oneplus TV 50U1S च्या किंमतीत ७ हजार रुपयांनी वाढ होऊन ४६,९९९ रुपये झाली आहे. आधी याची किंमत ३९,९९९ रुपये होती.
  • OnePlus TV 55U1S ची किंमत ४७,९९९ रुपयांवरून ५२,९९९ रुपये झाली आहे.
  • OnePlus TV 65U1s हा ६ हजार रुपयांनी महागला आहे. याची किंमत ६२,९९९ रुपयांवरून ६८,९९९ रुपये झाली आहे.
वाचा: टीव्हीच्या किंमती वाढण्यामागे हे आहे कारण सप्लाय चेनच्या तुटवड्यामुळे आणि अन्य गॅजेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या चिपसेट, डिस्प्ले पॅनेल, डिस्प्ले ड्राइव्हर आणि बॅक पॅनेल व्यतिरिक्त बॅटरीचा कमतरता जाणवत आहे. यामुळे टीव्हीच्या किंमती वाढल्या आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U8QYXP