Full Width(True/False)

'रिटा रिपोर्टर' फेम प्रियाची ब्रा दिसली म्हणून केलं ट्रोल

मुंबई : छोट्या पडद्यावरील '' या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमात रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील तितकीच लोकप्रिय झाली आहे. प्रिया अहुजा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. अलिकडेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले. प्रियाने शेअर केलेल्या फोटोंना तिने सुंदर कॅप्शन गेत लिहिले की, 'जे काही तुमच्या आत्म्याला समाधान देणार आहे ते करा.' प्रियाचे हे फोटो तिच्या नवऱ्याने म्हणजे यांनी काढले. मालव हे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे दिग्दर्शक आहेत. प्रियाचे अतिशय ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून लाइक आणि कमेन्ट केल्या. या फोटोंत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसत असल्याने काहींनी तिला ट्रोल केले. ट्रोल होणे कलाकारांना नवीन नाही, परंतु जेव्हा एका ट्रोलरने मर्यादा सोडत प्रियावर अतिशय खालच्या भाषेत कमेन्ट केली तेव्हा मालव संतापला. त्यांनी या युझरला सडेतोड उत्तर दिले. मालव यांनी लिहिले की, 'हेच तुमच्या आई किंवा बहिणीला बोलून बघा, पाहा त्यांची प्रतिक्रिया कशी येतेय.' प्रियाचे फोटो पाहून तिला ट्रोल करणाऱ्या आणखी एकाला ‘तारक मेहता..’च्या फॅन ग्रुपनेच सणसणीत उत्तर दिले आहे. तर आणकी एका युझरने लिहिले की,' मॅम तुमची ब्रा दिसतेय..' यावर इन्स्टाग्रामवरील फॅन पेजने लिहिले की, 'आणि तुमचे खालच्या पातळीचे विचारही दिसत आहेत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kWUGyL