Full Width(True/False)

स्वतःच्या फोटोचे 'असे' बनवा Cool WhatsApp Sticker आणि शेयर करा मित्र-मैत्रिणींसोबत, पाहा टिप्स

नवी दिल्ली. इन्स्टंट मेसेजिंग App वर बरीच खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी युजर्सना खूप आवडतात. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे स्टिकर्स. स्टिकर्सद्वारे,युजर्स त्यांचे विचार फारच थोड्या आणि वेगळ्या शब्दांत व्यक्त करू शकतात. कित्येक लोक तर स्टिकर्ससह दिवसभर चॅट्स करतात. आपण Google Play Store वरून विविध प्रकारचे स्टिकर डाउनलोड तर करूच शकता. पण, स्वतःच्या फोटोचे स्टिकर देखी यात बनवू शकता. जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःच्या फोटोचे भन्नाट स्टिकर कसे बनवता येईल स्टेप बाय स्टेप. वाचा: WhatsApp स्टिकर कसे बनवायचे:
  • यासाठी, आपल्याला प्रथम Google Play Store वरून आपल्या फोनवर स्टिकर मेकर अॅप डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर अ‍ॅप उघडून स्क्रीनवर दिलेल्या क्रिएट न्यू स्टिकर पॅक ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • नंतर आपल्या स्टिकर पॅकला एक नाव द्या. मग तयार झालेल्या फोल्डरवर क्लिक करा.
  • ते उघडल्यानंतर आपल्याला बरेच बॉक्स मिळतील. यातील एकावर क्लिक करा.
  • यानंतर दिलेल्या गॅलरी पर्यायावर टॅप करा आणि आपल्या कोणत्याही फोटोंवर टॅप करा.
  • त्यानंतर आपण आपला फोटो एडिट करा आणि सेव्ह करा. हा फोटो स्टिकर म्हणून सेव्ह होईल.
  • यानंतर आपल्या फोटोचे स्टिकर तयार होईल.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर हे स्टिकर्स शेयर करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी ३ स्टिकर्सची आवश्यकता असेल.
काही काळापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर आयओएस बीटा युजर्ससाठी डिसअपीयरिंग मेसेज वैशिष्ट्य सादर करण्यात आले होते. व्ह्यू वन्स एकदा या नावाने याची ओळख झाली. या वैशिष्ट्या अंतर्गत, व्हिडिओ आणि फोटो स्वयंचलितपणे अदृश्य होतात हे विशेष. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIIam1