Full Width(True/False)

फोन सतत चार्ज करण्याचे टेन्शन संपले, मिनिटांत चार्ज होतात हे स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

आपण जेव्हा स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा आपण बर्‍याच गोष्टींकडे लक्ष देतो. स्मार्टफोनची मुख्य वैशिष्ट्ये प्रत्येकासाठी भिन्न असतात. काहींना फोनमध्ये मजबूत बॅटरी हवी असते तर काहींना मस्त कॅमेरा. तर काही लोक बजेटकडे विशेष लक्ष देतात. बरेच लोक असे आहेत ज्यांना फोनमध्ये वेगवान चार्जिंग फीचर आवश्यक असते. असा फोन जो चार्ज व्ह्ययला फार वेळ घेणार नाही. सुरुवातीला वेगवान चार्जिंग सपोर्ट केवळ काही टॉप-एंड फ्लॅगशिप फोनमध्ये देण्यात येत होते. परंतु, आता फास्ट चार्जिंगचे हे फीचर काही काळापासून हे मिड-रेंज फोनमध्ये देखील दिले जाते. तुम्ही देखील वेगवान चार्जिंगला सपोर्ट करणारा असा फोन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही दमदार फोन्सबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या या फास्ट चार्ज होणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल.

Samsung Galaxy M 51
Samsung Galaxy M 51

Samsung Galaxy M51: किंमत २२,९९९ रुपयांपासून

या फोनमध्ये ७००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन २५ W फास्ट चार्ज सपोर्टसह आला आहे. हा फोन केवळ ११५ मिनिटांत ० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत फोन चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. यात ६.७ इंचाचा सामोलेड प्लस एफएचडी + डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ६४ एमपी + १२ एमपी + ५ एमपी + ५ एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco X3 Pro
Poco X3 Pro

Poco X3 Pro: किंमत १८,९९९ रुपयांपासून

या फोनमध्ये ५१६० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ३३ डब्ल्यू फास्ट चार्ज सपोर्टसह आला आहे. इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर,यात ६.६७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. ४८ एमपी + ८ एमपी + २ एमपी + २ एमपीचा मागील कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. एक २० एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे.

​iQoo Z3
​iQoo Z3

iQoo Z3 : किंमत १९,९९० पासून

या फोनमध्ये ४४०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ५५ डब्ल्यू फ्लॅशचार्ज सपोर्टसह आला आहे. हा फोन केवळ १९ मिनिटांत ० टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. यात ६. ५८ इंचाचा एफएचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये ६४ एमपी + ८ एमपी + २ एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एक १६ एमपी फ्रंट कॅमेरा देखील उपस्थित आहे.

Xiaomi Mi 11X
Xiaomi Mi 11X

Xiaomi Mi 11X: किंमत २९,९९९ रुपयांपासून

या फोनमध्ये ४५२० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आला आहे. हा फोन केवळ ५२ मिनिटांत ० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, यात ६.६७ इंच AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ४८ एमपी + ८ एमपी + ५ एमपी चा मागील कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 5G
OnePlus Nord CE 5G

OnePlus Nord CE 5G: किंमत २२,९९९ रुपयांपासून

यात ४,५०० एमएएच बॅटरी आहे. हा फोन वार्प चार्ज ३० टी प्लस फास्ट चार्जिंग सपोर्टसह आला आहे. हा फोन केवळ ३० मिनिटांत ० टक्के ते ७० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर यात ६.४३ इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी ५ जी प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ६४ एमपी + ८ एमपी + २ एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एक १६ एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xJT0vH