Full Width(True/False)

कपिल शर्मानं केली मानधनात वाढ; आता एक आठवड्यासाठी घेणार इतके कोटी रुपये?

मुंबई : छोट्या पडद्यावरील हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतो याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान, नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यक्रमासाठी कपिल शर्माने त्याच्या मानधनातही वाढ केल्याची चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द कपिल शर्मा शो कार्यक्रम नव्याने सुरू होणार आहे. या नव्याने सुरू होणा-या कार्यक्रमासाठी कपिल शर्माने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे. आता कपिने एका आठवड्यासाठी एक कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. याआधी कपिलला एका आठवड्यासाठी ३० लाख रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर कपिलने त्याच्या मानधनात वाढ करत ते ५० लाख रुपये केले. आता त्याला एका आठवड्यासाठी एक कोटी रुपये हवे असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत चॅनेल अथवा कपिलकडून दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, कपिलच नाही तर या कार्यक्रमातील त्याच्या सहकलाकारांनीही त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे, हे जेव्हा कळले तेव्हापासून कार्यक्रमाबाबत विविध बातम्या सातत्याने समोर येत आहेत. याआधी कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून अर्चना पूरण सिंह येणार नसल्याची चर्चा सुरू होती. परंतु अद्याप यावर अर्चनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. द कपिल शर्मा शो कार्यक्रम हा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या यादीमध्ये हा कार्यक्रमाचा मोठा दबदबा होता. या कार्यक्रमात टिव्ही आणि सिनेमाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांसाठी वरदान ठरला होता. करोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरलेले असताना या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांचे काही काळ मनोरंजन झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ug0ms6