नवी दिल्ली. तुम्ही एका दिवसात किती तास स्मार्टफोन वापरता याकडे कधी लक्ष दिले आहे? जर नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, भारतातील स्मार्टफोन वापरणारे आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ पाहण्यात दिवसातून किमान ९२ मिनिटे आणि इंटरनेट ब्राउझ करताना दिवसात ८९ मिनिटे घालवतात. एरिसन कन्झ्युमरॅ लॅबच्या नवीन 'दि फ्यूचर ऑफ अर्बन रिएलिटी' अहवालात असे म्हटले आहे. अहवालानुसार, भारतीय स्मार्टफोन युजर्स दररोज किमान तीन तास वेळ व्हिडिओ पाहण्यात आणि इंटरनेट ब्राउझ करण्यात घालवतात. वाचा : इतकेच नव्हे तर एरिक्सनने असा दावा केला की, सर्वेक्षण केलेल्या ४६ टक्के लोकांनी करोना दरम्यान ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा वापर केला आणि स्मार्टफोन वापरणार्या सर्व भारतीयांमध्ये सरासरी वेळ ५ तास २४ मिनिटे होती. याबरोबरच असे सांगितले गेले आहे की, Covid-19 मुळे भारतीय वापरकर्त्यांनी प्रतिदिन सरासरी ४.४ तास अधिक ऑनलाइन राहण्यास सुरवात केली आहे. विद्यार्थी आणि कार्यरत लोक अभ्यास आणि कामावर दररोज दोन ते तीन तास स्मार्टफोनवर खर्च करतात. तसेच, नवीन प्रकारच्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान-सेवांच्या वापराच्या पातळीत १० % वाढ झाली आहे. अहवालानुसार सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ९२ टक्के लोक अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत तर फक्त ७ टक्के लोक आयओएस वापरतात. वापरकर्त्यांनी ब्राउझिंगमधील १९ टक्के आणि व्हॉईस कॉलमध्ये १० टक्के वेळ घालविला. तर, लोकांनी चित्रपट आणि व्हिडिओवर २५टक्के वेळ घालविला. भारतातील ५ जीचे भविष्य पाहता एरिकसन म्हणतात की, २०२१ मध्ये ५G हँडसेट खरेदी करण्यात पाच पैकी चार स्मार्टफोन ग्राहकांना रस आहे. या अहवालातील अन्य निष्कर्षांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ३६ टक्के भारतीयांचे असे मत आहे की सुरक्षिततेसाठी लोकांच्या माहितीवर नजर ठेवणे देखील ठीक आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xfPvgE