Full Width(True/False)

'केदारनाथ'च्या असिस्टंट डायरेक्टरला डेट करतेय सारा अली खान?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असते. एवढंच नाही तर तिचं नाव नेहमीच तिच्या सहकालाकारांसोबत जोडलं जातं. अगदी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत साराच्या लिंकअपच्या चर्चा झाल्या आहेत. पण सारानं यावर कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. पण आता साराचं नाव ''चा असिस्टंट डायरेक्टर जेहन हांडासोबत जोडलं जातंय. सध्या या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जेहन हांडानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सारा अली खानसोबत काही फोटो शेअर केले आहे. ज्यात सारा आणि जेहन बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. जेहनच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवरील हे फोटो सारानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्याला 'लव्ह यू, टेक मी बॅक' असं कॅप्शन दिलं आहे. ज्यामुळे या दोघांच्या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हे दोघं एकमेकांना डेट तर करत नाहीत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. याशिवाय याआधीही म्हणजेच मागच्या वर्षी जेहन हांडानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात सारासोबतचे फोटो होते. हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना जेहननं लिहिलं होतं, 'आपलं एवढ्या वर्षांचं प्रेम, मैत्री आणि अंसख्य आठवणींना ना कोणतं टेस्टामेंट आहे आणि ना कधी ते असणार आहे. प्रेम, सेलिब्रेशन, चांगला वाईट काळ, करोना, कोणाला माहीत होतं की, या वयात आपल्याला एवढ्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल. पण सर्वच वेळी आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. धन्यवाद आणि मी तुला वचन देतो की, मी नेहमीच तुला साथ देईन.' दरम्यान 'लव्ह आजकल २' चित्रपटाच्या वेळी सारा अली खानचं नाव अभिनेता कार्तिक आर्यनशी जोडलं गेलं होतं. अनेकदा हे दोघं एकत्र फिरतानाही दिसले होते. पण काही काळानंतर या दोघांमध्ये दुरावा आल्याचं बोललं जातं. साराच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच 'अतरंगी रे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ती विकी कौशलसोबच 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटातही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Ah6Fwg