मुंबई- छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेली मालिका '' गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या हलक्या- फुलक्या विनोदाने मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतं. मालिकेतील सर्व कलाकार आपापली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आले आहेत. परंतु, त्यातही प्रेक्षकांना मालिकेतील सगळ्यात जास्त आवडणारं पात्र म्हणजे . जेठालालची भूमिका साकारणाऱ्या यांनी त्यांच्या अभिनयाने पात्राला चार चाँद लावले. परंतु, दिलीप यांच्याआधी जेठालालच्या भूमिकेसाठी आणखी पाच कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, त्यांनी हे पात्र करायला नकार दिला. पाहूया कोण आहेत ते कलाकार. योगेश त्रिपाठी'भाभीजी घर पर हैं?' या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारे अभिनेते योगेश त्रिपाठी यांना जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, इतर मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. किकू शारदा'द कपिल शर्मा शो' मधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता किकू शारदा याला जेठालालच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. परंतु, पूर्णवेळ मालिका करायची नसल्याचं सांगत त्याने भूमिकेसाठी नकार दिला. एहसान कुरेशी स्टॅण्डअप कॉमेडीयन एहसान कुरेशी यांनादेखील जेठालालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. त्याच्या नकारामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अली असगर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेल्या अली असगरला देखील जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, इतर कार्यक्रमात व्यग्र असल्याने त्याने कार्यक्रमाला नकार दिला. अलीने 'कहानी घर घर की', 'कुटूंब', 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' सारख्या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. राजपाल यादव बॉलिवूडमधील उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि कॉमेडियन अशी ओळख असणाऱ्या राजपाल यादवला देखील जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, बॉलिवूडसोडून छोट्या पडद्यावर काम करण्यास तयार नसल्याने राजपालने या भूमिकेला नकार दिला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hIdjUO