Full Width(True/False)

Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात २१ जुलैला येतोय, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः ला भारतात २१ जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. ही माहिती अॅमेझॉनने दिली आहे. ई-कॉमर्स साइट वर अपकमिंग फोनसाठी एक डेडिकेटेड मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy M21 च्या तुलनेत अपग्रेडेट कॅमेरा सोबत येणार आहे. वाचाः अॅमेझॉनने ही माहिती दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी Edition ला भारतात २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. हा फोन अॅमेझॉन प्राइम डे लाँचचा एक भाग असणार आहे. म्हणजेच हा सेल दरम्यान उपलब्ध होणार आहे. सेलचे आयोजन २६ आणि २७ जुलै रोजी करण्यात येणार आहे. ग्राहकांना एचडीएफसी बँक द्वारे पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. सोबत ग्राहकांना Galaxy M21 2021 Edition आर्कटिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकाल. वाचाः Samsung Galaxy M21 2021 Edition चे फीचर अॅमेझॉन मायक्रोसाइटवर लाँच आधीच 2021 Edition चे काही फीचर सांगण्यात आले आहेत. त्यामुळे असे वाटत आहे की, सॅमसंगच्या फोनचे काही फीचर्स गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy M21 सारखेच असणार आहेत. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले आणि 6,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. सोबत मिळालेल्या काही माहितीनुसार, या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सेटअप काउंट आणि प्रायमरी सेन्सरचा रिझॉल्यूशन गेल्यावर्षी लाँच झालेल्या एम २१ सारखाच असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36Izp3m