Full Width(True/False)

जिओची ‘ही’ सेवा १ वर्ष मोफत वापरण्याची संधी, डेटासह अनेक फायदे फ्री

नवी दिल्ली : नवीन ग्राहकांना शी जोडण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहे. कंपनी सेवा एक महिना आणि एक वर्षासाठी मोफत वापरण्याची देखील सुविधा देत आहे. जर तुम्ही जिओ फायबरचे नवीन ग्राहक असाल तर कंपनी ३० दिवसांचे मोफत ट्रायल देत आहे. वाचाः जर तुम्हाला केवळ डेटा हवा असेल तर जिओ तुमच्याकडून १५०० रुपये रिफंडेबल अमाउंट घेईल. या प्लानमध्ये ग्राहकांना १५० एमबीपीएस स्पीड कोणत्याही लिमिटशिवाय आणि ONT Modem मिळेल. जर तुम्हाला ब्रॉडबँड कनेक्शनसह ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन हवे असल्यास २५०० रुपये रिफंडेबल अमाउंट द्यावी लागेल. नवीन ग्राहकांसाठी हे देखील एक महिना मोफत असून, यात १३ ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन दिले जाते. १५० Mbps स्पीड केवळ ट्रायलच्या कालावधी दरम्यान मिळेल. यानंतर प्लाननुसार ग्राहकांना बेनिफिट्स मिळतात. जर तुम्हाला सबस्क्रिप्शन नको असेल व तरीही एक वर्षासाठी वापरू शकता. यासाठी कंपनी प्रमोशनल ऑफर देत आहे. वाचाः अशा ग्राहकांना एक महिन्यासाठी जिओ फायबर सर्व्हिस मोफत देते, जे नवीन रेफ्रेंस देतात. म्हणजे तुम्ही रेफर केल्यावर एखाद्या ग्राहकाने जिओ फायबर सेवा घेतल्यास तुम्हाला एक महिन्यासाठी ही सेवा मोफत मिळते. एक वर्षात तुम्ही कितीही वेळा रेफर करू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर तुमच्या रेफरद्वारे १२ नवीन ग्राहक जिओ फायबरशी जोडले गेल्यास, १२ महिन्यांसाठी ही सेवा मोफत मिळेल. रेफर करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅपमध्ये जाऊन JioFiber रेफर पर्याय निवडून शेअर करावे लागेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ioJckr