Full Width(True/False)

Prime Day'21 मध्ये छोटे व्यावसायिक लाँच करणार २,४०० हून अधिक प्रोडक्ट्स: Amazon India, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. इंडियातर्फे नुकतेच सांगण्यात आले की, प्राइम डेसाठी विविध श्रेणींमध्ये स्टार्टअप्स, महिला उद्योजक, कारागीर आणि विणकरांसह १०० हून अधिक लघु व मध्यम व्यवसाय (एसएमबी) विविध प्रकारातील २,४०० हून अधिक नवीन प्रोडक्ट्स सादर करणार आहेत. Amazon २६-२७ जुलै रोजी भारतात प्राइम डे फ्लॅगशिप सेल आयोजित करणार आहे. यात स्टार्टअप्स आणि ब्रँड्स, महिला उद्योजक, कारागीर आणि विणकरांसह एसएमबी घर आणि स्वयंपाकघर, फॅशन, सौंदर्य, दागिने, स्टेशनरी, लॉन आणि गार्डन, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक्स, यासारख्या विभागांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणली जातील असेही निवेदनात म्हटले आहे. वाचा: त्यात ७५, ००० हून अधिक 'Amazon ऑन लोकल शॉप्स' विक्रेते ४५० हून अधिक शहरांमधून प्राइम डेमध्ये सहभागी होतील. छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात कम बॅक करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या निरंतरात आम्ही हा प्राईम डे एसएमबीला समर्पित करीत आहोत, यामध्ये Amazon neighborhood ७५,००० हून अधिक लोकल ऑफलाईन शॉप्स आहेत ज्यांचे प्राइम डे मध्ये पदार्पण होईल, असे ” Amazon इंडियाचे संचालक (एमएसएमई आणि विक्री भागीदार अनुभव) ) प्रणव भसीन यांनी सांगितले. दशलक्षहून अधिक कारागीर आणि विणकरांना, लाखो महिला उद्योजकांना आणि लाँचपॅडच्या हजारो स्टार्ट-अप आणि ब्रँडच्या वाढीस गती देण्यासाठी ग्राहकांना ऑफरवर व्यापक निवडीचा आनंद घेता येईल. असेही ते म्हणाले. तसेच व्यावसायिक देखील “प्रत्येक प्राइम डे विक्रेते ग्राहकांसाठी नवीन उत्पादने बाजारात आणताना दिसत आहेत . यात त्यांना यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. शिवाय, करोनामुळे त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमधून बाहेर येण्याची संधी हा त्यांना मिळेल. असेही ते म्हणाले. Amazon इंडियाने अलीकडेच आगामी उत्सव हंगामाच्या अगोदर आणि प्राइम डेच्या विक्रीपूर्वी ११ नवीन गोदामांच्या प्रक्षेपण आणि साठवण क्षमता वाढवण्यासाठी ९ एग्झिस्टिंग फॅसिलिटीचा विस्तार करून आपल्या पूर्ततेचे नेटवर्क वाढवण्याची घोषणा देखील केली आहे. ही fulfilment Centres (FCs) महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आसाम, राजस्थान, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kFiqXE