Full Width(True/False)

दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे नेहा धुपिया, बेबी बंपसह शेअर केला फोटो

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार आहे. नेहा धुपियाने पती आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गोड बातमी दिली. या फोटोत नेहा धुपियाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. अंगद आणि मेहरही नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आनंदी दिसत आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत फोटो शेअर करताना नेहाने लिहिले की, 'या फोटोला काय कॅप्शन द्यायचं याचा आम्ही दोन दिवस विचार करत होतो. शेवटी सर्वात चांगलं वाटतं ते हेच.. देवा तुझे खूप खूप आभार.' इथे पाहा नेहा धुपियाची पोस्ट- दरम्यान, ४० वर्षीय नेहा धुपियाने २००२ मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर २००३ मध्ये तिने 'कयामत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहाने १० मे २०१८ रोजी अंगद बेदीशी लग्न केले. नेहा आणि अंगदची पहिली मुलगी मेहरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मेहरचा जन्म झाला. नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अखेर काजोलच्या 'हेलिकॉप्टर ईला' सिनेमात दिसली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zb2D75