Full Width(True/False)

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १.५ जीबी डेटा, पाहा कोणत्या कंपनीचा प्लान बेस्ट

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांना एकाच किंमतीत अनेक प्लान ऑफर करीत आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच काही प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १.५ जीबी पर्यंत डेटा मिळेल. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे प्लान स्वस्त असूनही तो महिनाभर चालतो. या प्लानची किंमत १९९ रुपये आहे. जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi पैकी कोणत्या कंपनीचा प्लान बेस्ट आहे. पाहा. वाचाः Airtel चा १९९ रुपयांचा प्लान एअरटेल आपला १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा पर्यंत ऑफर करते. यात २४ दिवसांची वैधता मिळते. या प्रमाणे ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. याशिवाय, ग्राहकांना ३० दिवसांचे Prime Video मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, Free Hellotunes, Airtel Xstream आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः Vi चा १९९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाच्या प्लानमध्ये एअरटेलचा प्लान सारखीच सुविधा मिळते. यात २४ दिवसांसाठी वैधता सोबत रोज १ जीबी डेटा मिळतो. सोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जातात. अन्य सुविधेमध्ये फक्त Vi Movies & TV Basic चे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः Jio चा १९९ रुपयांचा प्लान जिओचा प्लान या तीन प्लानमध्ये सर्वात जास्त वैधता आणि डेटा ऑफर करतो. जिओ प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि रोज १.५ जीबी डेटा मिळतो. याच पद्धतीने एकूण डेटा ४२ जीबी मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, JioTV, JioNews आणि JioCinema सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bh16hA