Full Width(True/False)

Video- चालताना अचानक खाली पडला अक्षय कुमार, नेमकं घडलं?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. आपल्या चित्रपटासोबत तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. अनेकदा तो आपल्या व्हिडीओच्या माध्यामातून चाहत्याचं मनोरंजन करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा म्यूझिक व्हिडीओ '' रिलीज झाला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अशात आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात चालत असताना अचानक अक्षय कुमार खाली पडताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. अक्षय कुमारनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो समोरून चालत येताना दिसत आहे. पण चालत असताना तो अचानक धपकन खाली पडतो आणि आपला गुडघा पकडून वेदनेनं कळवळतो. दरम्यान या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'फिलहाल २'चं म्यूझिक वाजत असतं. अक्षय कुमारनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, 'जिथे जास्तीत जास्त वेळी प्रेम तुम्हाला आनंद आणि हास्य देतं पण आता ते वेदना देतंय.' अर्थात या व्हिडीओतून अक्षय कुमार त्याच्या गाण्याचं प्रमोशन करत आहे. तो खरंच पडलेला नाही. अक्षय कुमार आणि नुपूर सेनॉन यांचं गाणं 'फिलहाल २' काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं आहे. हे गाणं चाहत्यांमध्य खूपच लोकप्रिय झालं आहे. आतापर्यंत २२० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या आधी अक्षय आणि नुपूर यांचं २०१९ साली रिलीज झालेलं 'फिलहाल' गाणं युट्यूबवर १ बिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं होतं. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. अक्षय कुमार आगामी काळात 'सूर्यवंशी', 'पृथ्वीराज', 'बेल बॉटम', 'अतरंगी रे', 'राम सेतु', 'बच्चन पांडे' आणि 'रक्षाबंधन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट २०२०च्या मार्चमध्येच रिलीज होणार होता. मात्र करोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rhAo41