Full Width(True/False)

पंतप्रधान मोदी ट्विटरवरही अव्वल, गाठला ७ कोटी फॉलोअर्सचा टप्पा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मोदी सोशल मीडियाचा पुरेपुर उपयोग करताना अनेकदा पाहण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील त्यांची लोकप्रियता अफाट आहे. आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर देखील आघाडीवर असून, ट्विटरवर त्यांनी ७ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. वाचा: पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर जगात सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००९ साली ट्विटरचा वापर सुरू केला होता. २०१० मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. नोव्हेंबर २०११ मध्ये हा आकडा ४ लाखांवर पोहचला होता. पंतप्रधान फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी व इतर माहिती देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. , युट्युबच्या माध्यमातून देखील ते लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वच्च भारत अभियान, महिला सुरक्षा आणि वेगवेगळ्या अभियानांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. मोदींनी कोरोना संकटात देखील लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. २०१८ मधील एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी जगातील टॉप ३ नेत्यांपैकी एक आहेत. वाचा: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती १२९.८ मिलियन फॉलोअर्ससह अव्वल स्थानी आहेत. त्यांच्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती यांचे ट्विटरवर ८४ मिलियन फॉलोअर्स होते. मात्र ट्विटरने त्यांचे अकाउंट हटवल्याने पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमाकांवर पोहचले आहे. अशात बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान मोदींचेच ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर २६.२ फॉलोअर्स आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींचे १९.४ मिलियन, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांचे ३०.९ मिलियन आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे ट्विटरवर १८.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BRxyHD