Full Width(True/False)

रियलमीचा पहिला टॅबलेट येतोय, खूपच बेस्ट डिझाइन सोबत मिळतील हे फीचर्स

नवी दिल्लीः रियलमी लवकरच आपला पहिला टॅबलेट लाँच करणार आहे. स्लॅशलीक्सने याचा पहिला फोटो लीक केला होता. सीईओ माधव सेठ यांच्या माहितीनुसार, कंपनी पहिल्या टॅबलेट सोबत आपला पहिला लॅपटॉप आणि रियलमी बुक सुद्धा लाँच करणार आहे. रियलमीने स्पष्ट केले आहे की, आपला पहिला टॅबलेट जीटी स्मार्टफोनच्या ग्लोबल सोबत लाँच करणार आहे. वाचाः लीक फोटोच्या माहितीनुसार, टॅबलेटची डिझाइन खूपच स्लीम असणार आहे. तसेच एका कॉर्नरमध्ये कॅमेरा दिला जाणार आहे. एका फोटोत याचा फ्रंट पॅनेल दिसेल. तर यात तुम्हाला क्वॉलिटी संबंधी अंदाज लावता येवू शकतो. याच्यात फ्रेम अॅल्यूमिनियम आहे. याचाच अर्थ आहे की, हे एक प्रीमियम डिव्हाइस असणार आहे. यात फ्लॅगशीप हार्डवेयर दिला जावू शकतो. हे स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट आणि जास्त स्टोरेजी स्पेस सोबत येईल. वाचाः रियमली या टॅबलेटच्या स्पेक्स आणि फीचर्सवरून शांत आहे. आतापर्यंत याची एकही माहिती बाहेर आली नाही. परंतु, काही लीक्सच्या माहितीनुसार, म्हटले जात आहे की, हे करंट किंवा अँड्रॉयड ११ च्या लेटेस्ट अँड्रॉयड सिस्टमवर काम करणार आहे. रियलमीने आतापर्यंत याची घोषणा केली नाही की, कंपनी कधीपर्यंत रियलमी पॅडला लाँच करणार आहे. वाचाः रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी म्हटले की, हे सर्व प्रोडक्ट्स कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांना आकर्षित करतील. आम्ही या संबंधित खूपच उत्सूक आहोत. कंपनी या ठिकाणी थेट नोटबुक आणि आसुस, एचपी आणि लेनोवाच्या लॅपटॉप्स आणि अन्य दुसऱ्या प्रोडक्ट्सला जोरदार टक्कर देणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hWgjfq