नवी दिल्ली : वोडाफोन-आयडियाने () ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या काही प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत तब्बल ४० रुपये कपात केली आहे. कंपनीने ३९९ रुपये, ४४९ रुपये, ६९९ रुपये, ८०१ रुपये, ४०१ रुपये आणि १,१९७ रुपयांच्या प्लानमध्ये कपात केली आहे. आता या प्लान्सची किंमत क्रमशः ३५९ रुपये, ४०९ रुपये, ६५९ रुपये, ३६१ रुपये आणि १,१५७ रुपये आहे. नवीन किंमत कंपनीच्या अॅप्लिकेशन आणि वेबसाइटवर लिस्ट झाली आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाच्या प्लानमध्ये मिळतात जबरदस्त बेनेफिट्स ३५९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा, दररोज १०० मेसेज, बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओवर आणि वीआय मूव्हीजचे अॅक्सेस मिळेल. तर ४०९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ४ जीबी डेटा, बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोल ओव्हरसह ५६ दिवसांचे वीआय मूव्हीज आणि टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळते. () च्या ६५९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि ४ जीबी डेटा मिळतो. इतर फायदे समान आहेत. तर ७६१ रुपयांच्या प्लानमध्ये डिज्नी+ हॉटस्टार, अनलिमिटेड कॉलिंग, बिंग ऑल नाइट, विकेंड डेटा रोल ओव्हर आणि ८४ दिवसांसाठी वीआय मूव्हीज आणि टीव्हीचा अॅक्सेस मिळेल. वाचाः ३६१ रुपयांच्या पॅकमध्ये कंपनी डिज्नी+ हॉटस्टारचा अॅक्सेस देत आहे. तसेच दररोज ३ जीबी डेटा आणि २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यात बिंज ऑल नाइड, विकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies & TV ची सुविधा मिळते. तर १,१५७ रुपयांच्या पॅकमध्ये १८० दिवसांसाठी इतर फायद्यांसह झी५ चा अॅक्सेस, बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि वीआय मूव्हीज आणि टीव्हीचा अॅक्सेस मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3evRgi6