Full Width(True/False)

Boult Audio चा हा नवीन वायरलेस हेडसेट ANC सपोर्ट सोबत भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः ने भारतात आपला नवीन ओव्हर ईयर हेडफोन्स ला लाँच केले आहे. या डिव्हाइस मध्ये अॅक्टिव नॉइज कॅन्सिलेशन सपोर्ट दिला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, युजर्संना यात ३० दिवसांची बॅटरी मिळेल. सोबत एक्स्ट्रा बेस आणि व्हाइस असिस्टेंटचा सपोर्ट मिळणार आहे. वाचाः Boult ProBass Anchor वायरलेस ANC ओवर-ईयर हेडफोन्सची किंमत ३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक याला अॅमेझॉनवरून ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. याची विक्री सुरू करण्यात आली आहे. या प्रोडक्ट् सोबत ग्राहकांना १ वर्षापर्यंत स्टँडर्ड वॉरंटी मिळेल. वाचाः Boult ProBass Anchor चे फीचर्स या डिव्हाइस च्या ईयरकप्स आणि हेडबँडला कम्फर्ट आणि लांब पर्यंत वापर करण्यासाठी सॉफ्ट प्रोटिन लेदर पॅडिंगची मदतने बनवण्यात आले आहे. यासाठी एक्सटीरियर मध्ये एरिगेंट लूकसाठी स्मूद आणि प्रीमियम फिनिशिंग दिली आहे. डिव्हाइसचे वजन १५० ग्रॅम आहे. Boult ProBass Anchor मध्ये ४० एमएम ड्रायव्हर्स दिले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, चांगले मिड्स आणि हाय सोबत एक्स्ट्रा बेस प्रोड्यूस करते. हेडसेट मध्ये इन बिल्ट लिथियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. दाव्यानुसार, यात युजर्संना ३० तासांची नॉन स्टॉप बॅटरी मिळेल. वाचाः या हेडसेटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अॅक्टिव नॉइज कॅन्सिलेशन फीचरचा सपोर्ट दिला आहे. हे अनवॉन्टेंड साउंडला एलिमिनेटेड करतील. यात व्हाइस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे. यात युजर्संना हँड्स फ्री एक्सपीरियन्स मिळेल. युजर्संना बटन प्रेस करुन गुगल असिस्टेंट किंवा सीरोला कमांड देता येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z5aAuA