Full Width(True/False)

ओप्पोचे ५ जबरदस्त स्मार्टफोन्स, मिळेल शानदार कॅमेरा आणि पॉवरफूल बॅटरी

नवी दिल्ली : ओप्पोचे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात दमदार फीचर्ससह येणारे कंपनीचे अनेक फोन्स उपलब्ध आहेत. ओप्पोच्या या फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम, मोठा डिस्प्ले, पॉवरफूल बॅटरी आणि फ्रंटला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळेल. विवोच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल. हे फोन कोणते आहेत पाहुयात. वाचाः ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ओप्पोच्या या फोनमध्ये ६.५१ इंच एचडी+ डिस्प्ले, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. बॅक पॅनेलवर १३ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह तीन कॅमेर मिळतील. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. ५००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत १५,९९० रुपये आहे. ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स एफ१७ प्रो मध्ये ६.४३ इंच फुलएचडी+ डिस्प्ले, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ३० वॉट वूक फ्लॅश चार्ज ४.० देण्यात आले आहे. फोन मीडियाटेक हेलियो पी९५ चिपसेट आणि ४०१५ एमएएच बॅटरीसह येतो. यात ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनची किंमत १९,९९० रुपये आहे. ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ओप्पो एफ१९ मध्ये ६.४३ इंच फुलएचडी+ डिस्प्ले, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, ५००० एमएएचची बॅटरी, स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळेल. बॅक पॅनेलवर तीन कॅमेरे मिळतील, ज्यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. याची किंमत १८,९९० रुपये आहे. OPPO A74 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ओप्पो ए७४ हा ५जी सपोर्टसह येतो. यात ६.४९ इंच डिस्प्ले, बॅक पॅनेलवर ४८ मेगापिक्सल + ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप मिळेल. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. ५००० एमएएचसह येणाऱ्या या फोनची किंमत १८,४९० रुपये आहे. OPPO F17 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ओप्पो एफ १७ मध्ये ६.४४ इंच फुलएचडी+ डिस्प्ले, ४०१५ एमएएचची बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. यात ३० वॉट कू वूक फ्लॅश चार्जर देण्यात आला आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणाऱ्या या फोनची किंमत १७,९९० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hYauOo