नवी दिल्ली. आजकाल इंटरनेटच्या मदतीने सर्व कामे ऑनलाईन करता येतात. याला ऑनलाईन बँक खाते देखील अपवाद नाही. तुम्हीही घरी बसून बँक खाते उघडू शकता. बँक अकाउंट उघण्यासाठी आता पूर्वीसारखी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. अशात जर तुम्हाला पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही हे काम ऑनलाईन देखील करू शकता. त्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पाहा या सोप्पी टिप्स. वाचा: ऑनलाईन बँक खाते कसे उघडावे:
  • सर्वप्रथम आपल्याला https://ift.tt/3e8aFW6 वर जावे लागेल.
  • ही पीएनबीची अधिकृत वेबसाइट आहे. येथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी बचत खात्यावर क्लिक करावे लागेल.
  • मग आपल्याला सेव्हिंग खाते किंवा उन्नती बचत खाती यापैकी एक निवडावे लागेल.
  • निवडण्यापूर्वी येथे दोघांच्या फायद्यांविषयी वाचू शकता. आपल्यासाठी जे काही फायदेशीर आणि योग्य वाटेल ते निवडा. यानंतर तुम्हाला संमती फॉर्म देण्यात येईल.
  • तो वाचल्यानंतर खाली दिलेल्या आय अ‍ॅग्री वर क्लिक करा आणि नंतर प्रोसीड वर क्लिक करा.
  • आपला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. मोबाइल नंबर प्रविष्ट करा जो आपल्या आधारशी लिंक केलेला आहे. मग पुढे जा वर क्लिक करा.
  • आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय करा आणि पुढे जा.
  • त्यानंतर उघडलेल्या पेजमध्ये तुम्हाला तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्डचा तपशील भरावा लागेल आणि खाली दिलेल्या बॉक्सला चेक करावे लागेल.
  • मग पुढे जा वर क्लिक करा. यानंतर पुन्हा आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
  • तो प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय करा आणि पुढे जा. यानंतर आपल्याला काही वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
  • आपल्याला ते सर्व येथे भरावे लागेल. येथून आपण सेवा निवडू शकाल. यानंतर आपल्याला एक व्हिडिओ केवायसी भरावा लागेल.
  • यात, कंपनीचा प्रतिनिधी व्हिडिओ कॉलवर आपले केवायसी पूर्ण करेल. त्यानंतर आपले खाते उघडले जाईल.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e4Euqz