Full Width(True/False)

Indian Idol 12- मराठमोळा गायक आशिष कुलकर्णी स्पर्धतेून बाहेर

मुंबई- सिंगिग रिअॅलिटी शो मधून बाद झाला आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी मतांमुळे आशिषला टॉप ६ मध्ये स्थान मिळवता आले नाही. आशा भोसले स्पेशल एपिसोडनंतर अनु मलिक यांनी हा निर्णय जाहीर केला. अनु मलिक म्हणाले की, लोकांच्या मताच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर या कार्यक्रमात सर्वाधिक मते मिळवलेल्या स्पर्धकांचेही नाव जाहीर करण्यात आले. अनु मलिक यांनी सर्व स्पर्धकांना मंचावर बोलावून सर्वातआधी सर्वात जास्त मते मिळविणार्‍या स्पर्धकाचे नाव सांगितले. या आठवड्यात ज्या स्पर्धकाला सर्वाधिक मते मिळाली ती स्पर्धक होती . अरुणिताचे स्पर्धेतील परीक्षकांनी आणि प्रमुख पाहूणे म्हणून येणाऱ्या इतर कलाकारांनी नेहमीच कौतुक केले आहे. याआधी अरुणिता जेव्हा आपल्या गावी मतांचे आवाहन करायला गेली होती तेव्हा इतकी गर्दी जमली होती की पोलिसांना बोलावण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी होणार ग्रँड फिनाले आशा भोसले स्पेशल एपिसोडमध्ये शोच्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवली गेली. यासह, शोच्या भव्य समाप्तीबद्दलही याची पुष्टी झाली की यावर्षी १५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले होणार आहे. यासह, अंतिम फेरी सलग १२ तास चालणार असल्याचेही समोर आले आहे. अंतिम फेरीक ६ स्पर्धक असतील आशिष कुलकर्णी याच्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर आता या सिंगिंग रिअॅलिटी शोला अंतिम सहा स्पर्धक मिळाले आहेत. या शोमध्ये उत्तराखंडचा , महाराष्ट्रातील सायली कांबळे, बँगलोरचा निहाल, हैदराबादची सन्मुखप्रिया, कोलकाताची अरुणिता कांजीलाल आणि उत्तर प्रदेशचा दानिश खान हे सहा स्पर्धक आहेत. म्हणजे यापैकीच एक ग्रँड फिनालेमध्ये इंडियन आयडल १२ चा विजेता बनेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36wEKdP