Full Width(True/False)

मतदान ओळखपत्र हरवले आहे ? मिनिटात करा डाउनलोड, पाहा पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : आधार कार्डप्रमाणेच देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक सरकारी कामांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. याशिवाय मतदानासाठी देखील ते आवश्यक आहेच. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असेल व तुम्हाला त्याची त्वरित गरज असल्यास काळजी करण्याचे गरज नाही. वाचाः देशभरात इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रोल फोटो () ची सुविधा सुरू झाली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटात सहज डिजिटल मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. ही सेवा २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली होती. e-EPIC बद्दल जाणून घ्या e-EPIC चे एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट (पीडीएफ) आहे, जे मोबाइल अथवा कॉम्प्यूटरवर सेल्फ-प्रिंटेबल म्हणून डाउनलोड करू शकता. हे ओळखपत्र मोबाइलवर देखील स्टोर करू शकता किंवा डिजी लॉकरमध्ये पीडीएफ स्वरूपात अपलोड करता येईल. याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता. वाचाः कसे कराल डिजिटल ओळखपत्र डाउनलोड
  • सर्वात आधी निवडणूक आयोगाची वेबसाइट https://ift.tt/3ljbzRf वर जा.
  • येथे च्या https://ift.tt/3wtyf6c या लॉगइन पेजवर जावे लागेल.
  • लॉगइन करण्यासाठी तुमचे अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • जर तुमचे अकाउंट नसेल तर ईमेल आयडी अथवा मोबाइल नंबरद्वारे अकाउंट तयार करू शकता.
  • अकाउंट उघडल्यानंतर काही डिटेल्स भरून लॉगइन करू शकता.
  • लॉगइन केल्यानंतर e-EPIC डाउनलोडचा पर्याय दिसेल.
  • डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सहज पीडीएफ फाइल डाउनलोड करू शकता.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rblV9O