Full Width(True/False)

Photos- पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा घराबाहेर पडली मंदिरा बेदी

मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिनेत्री च्या पतीचे यांचे निधन झाले. पतीच्या निधनामुळे मंदिरा बेदी पूर्णपणे तुटली होती. परंतु स्वत:ला सांभाळत तिने पतीचे अंत्यसंस्कार केले होते. यानंतर मंदिरा सार्वजनिक ठिकाणी दिसलीच नव्हती. पण नुकतीच ती आपल्या आईसोबत घराबाहेर पडली. यावेळी कॅमेऱ्याच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मंदिराच्या पतीचे राज कौशल यांचे ३० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या दिवसापासूनच मंदिराने स्वत:ला घरात कैद करून घेतले होते. घरी तिला भेटायला येणाऱ्या लोकांचीही सतत ये- जा सुरू होती. पण आता मंदिराने सगळं धाडस एकवटत घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच तिला मुंबईच्या रस्त्यांवर आईसोबत फिरताना पाहण्यात आले. राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर राज कौशलसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचे काही फोटो शेअर केले होते. मंदिराने या फोटोंसह कॅप्शनमध्ये हार्टब्रेकचे इमोजी शेअर केले होते. मंदिराने १९९९ मध्ये राज कौशलशी लग्न केले. त्यांना एक मुलगा वीर आणि एक मुलगी तारा आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मंदिरा आणि राज कौशल यांनी ताराला दत्तक घेतले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r3rJ52