नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप (Whatsapp) नवीन फीचर्सवर काम करीत आहे. याची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, यातील काही फीचर्स लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. ( Soon Launch These 3 Exciting Features) यात फोटो क्वॉलिटी, लिंक प्रिव्ह्यू, मल्टी डिव्हाइस सपोर्ट आणि व्ह्यू वन्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे. हे फीचर्स लवकरच अँड्रॉयड आणि आयओएस मध्ये सहभागी केले जातील. याची टेस्टिंग अखेरच्या टप्प्यात आहे. यानंतर हे फीचर्स आपल्या फोनमध्ये येतील. जाणून घ्या यासंबंधी डिटेल्स. वाचाः पुन्हा एकदा डिझाइन केले जाईल In-App नोटिफिकेशन या अॅप नोटिफिकेशनला आणखी चांगले करण्यासाठी काम केले जाणार आहे. WABetaInfo रिपोर्टच्या माहितीनुसार, आयओएस 2.21.140.9 साठी व्हॉट्सअॅप बीटा युजर्सला नोटिफिकेशन बॅनर, व्हिडिओ, फोटो, GIF आणि स्टिकर्सला आणखी चांगले केले जाईल. चॅट प्रिव्ह्यू पाहण्यासाठी या अॅप नोटिफिकेशनचा विस्तार करू शकता येईल. वाचाः व्ह्यू वन्स फीचर बीटा अॅपसाठी व्हॉट्सअॅपने या फीचरला रोल आउट करणे सुरू केले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे फीचर फोटो आणि व्हिडिओला समोरचा व्यक्ती एकदाच पाहू शकेल. त्यानंतर फाइल आपोआप डिलीट होईल. परंतु, यात फोटो आणि व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेता येवू शकेल. कंपनीने याला बंद केले नाही. वाचाः व्हाइस वेवफॉर्म फीचर व्हाइस वेवफॉर्म फीचरवर व्हॉट्सअॅप सध्या काम करीत आहे. लवकरच याची टेस्टिंग बीटा व्हर्जनवर केली जाणार आहे. व्हाइस मेसेज ऐकल्यानंतर प्रोगेस ऐवजी व्हाइस वेवफॉर्म दिसेल. हे फीचर फक्त आयओएस साठी तयार करण्यात आले आहे. हे काम अखेरच्या टप्प्यात सुरू आहे. अवघ्या काही दिवसात बीटा टेस्टर्ससाठी याला रोलआउट केले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xBx45Y