नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने नुकतेच आपल्या ग्राहकांसाठी एक खास सर्विस सुरू केली आहे. या सर्विसचे नाव इमरजेंसी डेटा लोन (emergency data loan) आहे. या सुविधे अंतर्गत ज्या ग्राहकांचे इंटरनेट संपले असेल तसेच त्यांची रिचार्ज करण्याची ऐपत नसेल अशा वेळी त्यांना १ जीबी डेटा दिला जाणार आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. वाचाः जिओची इमरजन्सी डेटा लोन सर्विस अंतर्गत Recharge Now and Pay Later रिचार्च आता करा पैसे नंतर द्या अशी सुविधा दिली जाते. जिओची इमरजन्सी डेटा लोनची सुविधा प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. एका युजरला जास्तीत जास्त ५ वेळा लोन घेता येवू शकते. प्रत्येक वेळी १ जीबी डेटा दिला जाईल. याची किंमत ११ रुपये प्रति जीबी डेटा असेल. जाणून घ्या या विषयी. वाचाः जिओ युजर्संना असे मिळेल १ जीबी इमरजन्सी डेटा आपल्या स्मार्टफोनमधील MyJio अॅप ओपन करा. टॉप-लेफ्ट मधील Menu वर जा. मोबाइल सर्विस अंतर्गत 'Emergency Data Loan' ची निवड करा आणि Proceed वर क्लिक करा. 'Get emergency data' ऑप्शनला सिलेक्ट करा. इमरजन्सी डेटा लोन मिळवण्यासाठी Activate now वर क्लिक करा. अशा प्रमाणे तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल. वाचाः यात खास बाब म्हणजे इमरजन्सी डेटा लोन त्याचवेळी घेता येवू शकते ज्यावेळी तुमचा सध्याचा डेटा लिमिट संपला असेल. १ जीबी डेटाच्या ११ रुपयांचा पेमेंट ग्राहकांना माय जिओ अॅप नंबवर मेन बॅलेन्सचा रिचार्ज करून नंतर पे करू शकता. यात मिळणारी डेटाची वैधता तुम्हाला बेस प्लानवर अवलंबून आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xPjbBx