नवी दिल्ली : भारतात स्मार्ट टीव्हीसाठी असलेली मोठी मागणी लक्षात घेता सॅमसंगने ग्राहकांसाठी जबरदस्त सेलची घोषणा केली आहे. सॅमसंगने ती घोषणा केली असून, १५ जुलैपासून सुरू झालेला हा सेल २० ऑगस्टपर्यंत चालेल. या सेलमध्ये ५५ इंच आणि त्याच्या पुढील साइजच्या Neo QLED आणि QLED TV वर हजारो रुपये डिस्काउंट दिले जात आहे. वाचाः सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला १ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या किंमतीचा साउंड बार मोफत मिळेल. सोबतच २० टक्के कॅशबॅकसह ईएमआयचा लाभ देखील मिळेल. त्यामुळे तुम्ही जर ब्रँडचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. वेगवेगळ्या मॉडेल्सवर हजारो रुपये सूटसह अन्य फायदे मिळतील. ग्राहकांना ५५ इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असलेले Neo QLED, QLED TV मॉडेल आणि UHD TV मध्ये ७५ इंच मॉडेल खरेदी केल्यास A series Soundbar मध्ये १८ हजार रुपयांचा HW-A४५० किंवा २४ हजार रुपये किंमतीचा HW-A५५० साउंडबार मोफत मिळेल. वाचाः ७५ इंच किंवा त्यापेक्षा मोठे Neo QLED आणि QLED TV मॉडेल खरेदी केल्यास ५२ हजार रुपये किंमतीचा Q series Soundbar HW-Q८००A किंवा १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा Q series Soundbar HW-Q९००A गिफ्ट स्वरूपात मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BraQWX