Full Width(True/False)

सट्टेबाजी तर कधी फसवणूक, वेगवेगळ्या वादात अडकलाय राज कुंद्रा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन याला सोमवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं अटक केली आहे. राज कुंद्रावर अश्लिल आणि न्यूड चित्रपट तयार करणे आणि पेड अॅप्स, वेबसाइटवर रिलीज केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे राजच्या विरोधात ठोस पुरावे आहेत आणि त्यात राजच मुख्य आरोप असल्याचं मानलं जात आहे. पण असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. या आधीही वेगवेगळ्या कारणांनी राज कुंद्राचं नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राज कुंद्राचा जन्म ९ सप्टेंबर १९७५ साली ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या पंजाबी कुटुंबात झाला होता. राजचे वडील लंडनमध्ये बस कंडक्टर होते. कालांतरानं त्यांनी स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू केला. हळूहळू त्यांचा हा बिझनेस वाढत गेला. राज कुंद्रानंही कुटुंबाचा हा बिझनेस जगभरात पसरवला. राज कुंद्रा भारतीय वंशाचा असला तरीही त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकता आहे. राज कुंद्राची पहिलं लग्न २००३ साली कविता कुंद्राशी झालं होतं. हे लग्न फार काळ टिकलं नाही. २००६ साली या दोघांचा घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत राज कुंद्रानं कवितापासून घेतलेल्या घटस्फोटाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. पण त्याआधी घटस्फोटानंतर कवितानं राज आणि शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते. कवितानं घटस्फोटानंतर दिलेल्या एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शेट्टीवर धक्कादायक आरोप केले होते. आपल्या तुटलेल्या लग्नासाठी तिनं शिल्पाला जबाबदार मानलं होतं. त्यानंतर घटस्फोटाच्या जवळपास १२-१४ वर्षांनतर राज कुंद्रानं अलिकडच्या काळात दिलेल्या मुलाखतीत कविता आणि आपल्या बहीणीच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर आपल्या आईनंच कविताला अनेकदा रंगेहात पकडल्याचही त्यानं सांगितलं होतं. याशिवाय प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्याच्या विरोधात केस दाखल केली होती. पूनमचा आरोप होता की, तिला देशातून तसेच परदेशातूनही कॉल येत आहेत. ज्यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात एका टॅग लाईनसह (कॉल मी, आय स्ट्रिप फॉर यू )तिचा नंबर एका अॅपवर लीक झाला होता. पूनमचा दावा होता की, हे अॅप राज कुंद्राची कंपनीच चालवते. त्यामुळे तिनं राजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आयपीएल टीम राजस्थान रॉयल्समध्येही राज कुंद्राची भागीदारी होती. यावेळी त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या लोढा समितीनं आपल्या तपासात राज कुंद्राला दोषी ठरवलं होतं. तसेच त्याला क्रिकेटसंबंधीत उपक्रमांपासून दूर राहण्याचेही आदेश देण्यात आले होते. दरम्यान या वादामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघाला दोन वर्ष आयपीएलला मुकावं लागलं होतं. त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. राज कुंद्रावर २०१७ साली एका कपड्याच्या कंपनीनं २४ लाख रुपयांच्या फसवणूकीचा आरोप लावला होता. कंपनीनं आरोप केला होता की, राज कुंद्रा आणि यांनी कंपनीच्या नावावर जी रक्कम जमवली होती ती कंपनीला दिलीच नव्हती. त्यानंतर पोलिसांनी राजच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय राज कुंद्राचं नाव एकदा बिटकॉइन स्कॅमध्येही आलेलं आहे. पुण्यातील क्राइम ब्रांचनं केलेल्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. राज कुंद्रा आणि काही बॉलिवूड कलाकार बिटकॉइनमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एका अवैध स्कीमचं प्रमोशन करत होते. ज्यातून त्यांनी लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. हा घोटाळा जवळपास २ हजार कोटी रुपयांचा होता असं बोललं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ilxfMs