मुंबई : दिग्दर्शक यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या '' या सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमासाठी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अजून कुणाच्याही नावावर मोहर लावण्यात आलेली नाही. अलिकडेच रणबीर कूपर हा या सिनेमात काम करण्यासाठी तयार असल्याची बातमी आली होती. त्यामुळे तो लवकरच भन्साळींसोबत काम करेल अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता रणबीरऐवजी कार्तिक आर्यनचे नाव पुढे आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बैजू बावरा' या सिनेमात आलिया भट, दीपिका पादुकोण, अजय देवगण यांच्यासह ए- लिस्टेड कलाकारांच्या नावाची आधीपासूनच चर्चा आहे. त्यात काही दिवसांपूर्वी रणबीरच्या नावाचाही समावेश झाला होता. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूरने संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नसून ते अजूनही गोंधळात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच बैजू बावरा आणि धर्मा प्रॉडक्शनच्या या प्रोजेक्टबद्दल रणबीरने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. तसेच रणबीर आता भन्साळी यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक नाही. दरम्यान, भन्साळी यांच्या 'सांवरिया' या सिनेमावेळी रणबीरचा अनुभव फारसा चांगला नाही आणि त्यामुळेच त्याने दिग्दर्शकासोबत नंतर कोणताही सिनेमा केला नाही. ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळेच रणबीरने या प्रोजेक्टमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असावा. अर्थात याबाबत कुणीही अधिकृतरित्या काही सांगितलेले नाही. या बातम्या आल्यानंतर ई- टाइम्सने संजय लीला भन्साळी आणि यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कदाचित कार्तिक आर्यन एखादा दुसरा प्रोजेक्ट भन्साळी यांच्यासोबत करत असेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रोजेक्ट ओटीटीसाठी देखील असू शकतो. अर्थात या गोष्टीला कुणाहीकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे तर तो 'ब्रह्मास्त्र' आणि 'शमशेरा' या सिनेमांत दिसणार आहे. त्याशिवाय तो लव रंजन दिग्दर्शित सिनेमात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. तर कार्तिक आर्यन हा 'भूल भुलैय्या २' लवकरच रिलीज होणार आहे. अलिकडेच त्याने 'सत्यनारायण की कथा' या सिनेमात काम करणार असल्याची घोषणा केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rnJ9JC