Full Width(True/False)

रेप केसमध्ये ट्वीस्ट- महिलेविरोधात आधीच दाखल आहे खंडणीची केस

मुंबई : कंपनीचे मालक आणि निर्माता यांच्याविरोधात ३० वर्षांच्या मुलीने बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. काम देण्याचे आश्वासन देत भूषण कुमार यांनी ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत तिच्यावर बलात्कार केला होता असा आरोप युवतीने केला आहे. मात्र, हे सर्व आरोप टी-सीरिजने एका निवेदनाद्वारे फेटाळून लावले आहेत. उलट या मुलीनेच आमच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या हेतूने हे आरोप करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. पूर्वग्रहातून केले आरोप टी-सीरिजतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भूषण कुमार यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित असल्यानेच करण्यात आले आहेत. या मुलीने तिच्यावर बलात्कार केल्याचा जो आरोप केला आहे, तो खोटा आहे. त्या मुलीने टी सीरिजच्या एका सिनेमात आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. या निवेदनात असेही नमूद केले आहे की, मार्च २०२१ मध्ये या मुलीने भूषण कुमार यांच्याकडे एका वेब सीरिजच्या निर्मितीसाठी मदत करण्याची विनंती केली होती. परंतु तिला नकार दिला होता. त्यानंतर याच मुलीने तिच्या साथीदारांसह जून २०२१ मध्ये टी सीरिजकडून पैसे मागण्यास सुरुवात केली होती. याच्याविरोधात १ जुलै २०२१ रोजी कंपनीने अंबोली पोलीस ठाण्यात खंडणी मागण्यात येत असल्याची तक्रार नोंदवली. पैसे मागतानाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. हे रेकॉर्डिंग तपास यंत्रणेकडे देण्यात येणार आहे. या मुलीविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यामुळेच तिने हे सगळे आरोप केल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात टी- सीरिज आपल्या वकीलांकडून कायदेशीर सल्ला घेत असून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hJLEmo