नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम बाजरात मे महिन्यात अगदी विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले आहे. मे महिन्यात भारती एअरटेलच्या तब्बल ४६.१३ लाख ग्राहकांनी साथ सोडली. तर प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स जिओशी ३५.५४ लाख मोबाइल यूजर्स जोडले गेले आहेत. याबाबत ट्रायने आकडेवारी दिली आहे. मे महिन्यात भारतीय टेलिकॉम बाजारात तब्बल ६२.७ लाख यूजर्स कमी झाले आहेत. वाचाः मे महिन्यात जिओशी ३५.५४ लाख ग्राहक जोडले गेले. आता जिओच्या ग्राहकांची संख्या तब्बल ४३.१२ कोटी झाली आहे. आणि या दोन्ही कंपन्यांची लाखो ग्राहकांनी साथ सोडली आहे. मे महिन्यात ४६.१२ लाख ग्राहकांनी एअरटेलची साथ सोडली असून, आता कंपनीच्या ग्राहकांची संख्या ३४.८ कोटी आहे. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने () मे महिन्याची आकडेवारी जारी केली आहे. वोडाफोन-आयडियाने देखील मे महिन्यात ४२.८ लाख ग्राहक गमावले असून, त्यांच्या ग्राहकांची संख्या २७.७ कोटी राहिली आहे. मे महिन्यात भारतातील एकूणच मोबाइल सबस्क्राइबर्सची संख्या ६२.७ लाखांनी कमी होऊन ११७.६ कोटींवर आली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VhfZA4