Full Width(True/False)

आता तुमचे ट्विट करता येणार एडिट ? मात्र मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे

नवी दिल्ली : ट्विटरवर एकदा आपले मत मांडले की त्यात एडिट करण्याची संधी नसते. त्यामुळे अनेक दिवसांपासून यूजर्स एडिट बटनची मागणी करत आहेत. हे फीचर आणण्यास कंपनीचे सीईओ यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. अ‍ॅपमध्ये कधीही असे बटन मिळणार नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र, ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनसह Undo बटनची सुरुवात केली होती, जे एकप्रकारे हेच काम करते. आता ट्विटरचे प्रोडक्ट प्रमूख यांनी एडिट बटनसाठी शुल्क भरण्यास तयार आहात का ? असा प्रश्न यूजर्सला विचारला आहे. वाचाः ट्विटर भलेही एडिट बटनवर काम करत असेल, मात्र हे फीचर केवळ पेड सबस्क्राइबर्सलाच मिळण्याची शक्यता आहे. Beykpour यांनी स्वतःच्या हँडलवर एक पोल शेअर केला आहे. यात त्यांनी एडिट फीचर्ससाठी सबस्क्रिप्शन घेण्यास तयार आहात का ? असा प्रश्न विचारत उत्तर देण्यास सांगितले आहे. या पोलमध्ये आतापर्यंत जवळपास ६८.४ टक्के यूजर्सने ‘नो’ हा पर्याय निवडला, तर केवळ ३१.६ टक्के यूजर्सनी एडिट फीचर्ससाठी पैसे भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ट्विटर या फीचरवर विचार करण्याची शक्यता आहे. तसेच, Beykpour यांनी ट्विटच्या काही मिनिटातच एडिटची सुविधा मिळू शकते, असे संकेत देखील दिले आहेत. वाचाः दरम्यान, जॅक डोर्सी यांनी २०२० मध्ये संकेत दिले होते की, ट्विटरवर कधीही एडिटचे फीचर मिळणार नाही. कारण, ट्विटरच्या मूळ डिझाइनला कायम ठेवायचे आहे, जी प्रामुख्याने एक एसएमएस, टेक्स्ट संदेश सेवा होता. ट्विटरने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये ब्लू स्बस्क्रिप्शन प्लान सादर केला आहे. सबस्क्रिप्शनमध्ये अनेक फीचर्स मिळतात. यासाठी ३.४९ डॉलर मोजावे लागतात. या फीचरला अद्याप भारतात लाँच करण्यात आलेले नसले तरीही, अ‍ॅपवर सबस्क्रिप्शनची किंमत २६९ रुपये प्रति महिना पाहण्यात आली होती. मात्र आता अ‍ॅप स्टोरवर किंमत दिसत नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hKWRDx