Full Width(True/False)

तुमचे नखच आता तुमचे ATM, डेबिट कार्ड; पेमेंट सह सोशल मीडिया हँडल करा

नवी दिल्लीः जर तुमच्याकडे पैसे नाहीत किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरीच विसरला आहात?, तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे नख दाखवून शॉपिंग करू शकता. हो, हे खरं आहे. दुबईतील एका ब्यूटी सलूनमध्ये नखांत मायक्रोचिप लावली जात आहे. यामुळे तुम्हाला डिजिटल बिझनेस कार्ड म्हणून त्याचा वापर करता येवू शकतो. शॉपिंग कार्डचा वापर करू शकता. तसेच इंस्टाग्रामवर सूचनांची देवाण घेवाण करू शकता. नखावर लावण्यात आलेली मायक्रोचिप नियर फिल्ड कम्यूनिकेशन टेक्नोलॉजी म्हणून काम करते. सलूनचे मॅनेजर नूर यांनी सांगितले की, आमच्यासाठी एकमेव आव्हान हे होते की, नखात बसवण्यासाठी या चिपला छोटे बनवायला हवे होते. त्यांनी हे काम करोना काळात केले आहे. वाचाः त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ५०० हून अधिक मायक्रोचिप मॅनीक्योर करण्यात आली आहेत. नार मकारेम यांना अपेक्षा आहे की, भविष्यात नेल मायक्रोचिप अन्य कामासाठी उपयोगी पडेल. वेटर्ससाठी डिजिटल रेस्टॉरंट मेन्यू पासून संपर्क विना पेमेंट करण्यापर्यंतचा याचा वापर केला जाईल. मायक्रोचिप्सचा वापर Android आणि ios सॉफ्टवेयर सोबत केला जावू शकतो. व्यक्तींना जी सुद्धा माहिती हवी असेल ती अपडेट केली जावू शकते. वाचाः असे करते काम नेल सर्विसची सुरुवात जेल पॉलिस कोटपासून होते. त्यानंतर भरलेली चिपच्या खाली त्याला चिपकवले जाते. नखाला टिकाऊ पॉलिशने आणखी झाकले जाते. ब्यूटी लाउंजचे मालक नूर मकारेम यांच्या माहितीनुसार, चिप्स मध्ये अशी माहिती असू शकते, ज्याला डिजिटल बिझनेस कार्डच्या रुपाने त्याचा वापर केला जावू शकतो. आम्ही तुमचे नाव, मोबाइल नंबर, तुमचा सोशल मीडिया अकाउंट, आणि वेबसाइट सारखी माहितीला इंस्टॉल करू शकतो. त्यामुळे तुम्ही सहज ही माहिती किंवा अॅक्सेस शेयर करू शकता. ग्राहक याला हाय टेक चिपवर आपली वेबसाइट, सोशल मीडिया आणि संपर्क डाउनलोड करू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ukk46u