नवी दिल्ली : वर Electronics Sale सुरू असून, हा सेल १३ जुलैपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. तर तुम्ही १०८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वर चांगली डील मिळत आहे. वाचाः G60 व्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्सवर देखील डिस्काउंट देत आहे. Moto G60 ला भारतात १७,९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते, आता फ्लिपकार्टवर याची कमी किंमतीत विक्री होत आहे. या फोनला तुम्ही १७,४९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच ५०० रुपये सूट दिली जात आहे. या व्यतिरिक्त फोनवर १५,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये एचडीआर १० सपोर्ट मिळतो. यात ६.७८ इंच FHD+ १२० हर्ट्ज डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचाः एकीकडे शाओमी, रियलमी, सॅमसंग आणि विवो सारख्या कंपन्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहेत, अशात या फोनला तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. स्मार्टफोनच्या कॉम्पोनेन्ट्सची किंमत वाढल्याने फोनची किंमत वाढवली असल्याचे शाओमीने म्हटले होते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e4Mec7