Full Width(True/False)

COVID-19 मुळे सुनील शेट्टीचं पृथ्वी अपार्टमेन्ट BMC नं केलं सील

मुंबई- करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेत बृहन्मुंबई महानगर पालिकेने यांचे दक्षिण मुंबईतील अपार्टमेन्ट सील केल्याची बातमी समोर येत आहे. करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्टामाउंट रोडवरील पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आले असून याच अपार्टमेन्टमध्ये सुनील शेट्टी राहतात. एएनआयच्या वृत्तानुसार, 'दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोडवर असलेल्या पृथ्वी अपार्टमेंटच्या इमारतीला बीएमसीने सील केले आहे. या इमारतीत करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर बीएमसीने तातडीने इमारत सील करण्याची कारवाई केली. स्वतः सुनील या इमारतीत राहतात. बीएमसीचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील शेट्टी आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. काय आहेत बीएमसीचे नियम दरम्यान, मुंबईच्या करोना नियमांनुसार कोणत्याही इमारतीत पाच किंवा त्याहून अधिक करोना रुग्ण 'मायक्रो कंटेन्टमेन्ट एरिया' म्हणून घोषित केला जातो आणि ती इमार तातडीने सील केली जाते. एखाद्या इमारतीत करोनाचे पाचपेक्षा कमी रुग्ण आढळल्यास त्या इमारतीचा फक्त संबंधित मजला सील केला जातो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e4wfLi