Full Width(True/False)

अनलिमिटेड कॉलिंगसाठी बेस्ट आहेत हे प्लान, किंमत १८ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः स्वस्त आणि अनलिमिटेड डेटाच्या या जमान्यात अजूनही अनेक युजर्स आहेत की, त्यांना केवळ व्हॉइस कॉलिंग प्लान हवा आहे. अनेकांच्या घरात हाय स्पीड डेटा ब्रॉडबँड प्लान लावलेला आहे. काही फीचर फोनचा वापर करीत आहेत. त्यामुळे लोकांना जास्त डेटाच्या प्लानची गरज उरत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या व्हाइस व्हाउचर्ससंबंधी माहिती सांगत आहोत. कमी किंमतीत तुमची कॉलिंगची गरज पूर्ण होते. च्या या प्लान्सची किंमत १८ रुपयांपासून सुरू होते. वाचाः BSNL चा १८ रुपयांचा व २९ रुपयांचा प्लान बीएसएनएलचा सर्वात स्वस्त कॉलिंग प्लान १८ रुपयांचा आहे. यात तुम्हाला २ दिवसांची व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात रोज १ जीबी डेटा एकूण २ जीबी डेटा दिला जातो. यात मोठा प्लान २९ रुपयांचा आहे. ज्यात ५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय, १ जीबी डेटा, ३०० एसएमएसची सुविधा दिली जाते. वाचाः BSNL चा ९९ रुपयांचा व ११८ रुपयांचा प्लान जर तुम्हाला २२ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा लाभ हवा असेल तर बीएसएनएलचा ९९ रुपयांचा व्हाउचर घेवू शकता. यात ९९ एसएमएस दिले जाते. यापेक्षा जास्त किंमतीचा प्लान म्हणजे ११८ रुपयांचा आहे बीएसएनएलच्या ११८ रुपयांच्या व्हाउचर्स मध्ये २६ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जाते. याशिवाय, रोज ०.५ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. वाचाः BSNL चा १४७ रुपयांचा व ३१९ रुपयांचा प्लान शेवटी, बीएसएनएलच्या ज्या दोन व्हाइस व्हाउचर्समध्ये १४७ रुपये आणि ३१९ रुपयांचा प्लान आहे. १४७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत एकूण १० जीबी डेटा मिळतो. तर ३१९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये ७५ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, ९९ एसएमएस आणि १० जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xzbzmx