Full Width(True/False)

खूपच कमी किंमतीत येतात ‘हे’ ४ स्मार्ट टीव्ही, मिळतील एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षात स्मार्ट टीव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, जास्त किंमतीमुळे अनेकजण खरेदी करणे टाळतात. तुमचे बजेट कमी असेल तर ई-कॉमर्स साइट , आणि ऑफलाइन बाजारात १५ हजारापेक्षा कमी किंमतीचे चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. या टीव्हीमध्ये देखील Netlix, Amazon, Disney+Hotstar, zee5 आणि sony liv चा देखील सपोर्ट मिळेल. वाचाः ची किंमत आणि फीचर्स Thomson 9A Series 80 cm (32 inch) इंच टीव्ही १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतो. अँड्राइड टीव्ही ओएसवर काम करणाऱ्या टीव्हीची किंमत १३,९९९ रुपये आहे. या टीव्हीमध्ये गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. हा एचडी रेडी टीव्ही असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे व यात २४ वॉटचा साउंड आउटपूट मिळेल. 32 ची किंमत आणि फीचर्स कोडेक कंपनी फ्लिपकार्टवर KODAK 7XPRO Series 32 inch HD Ready LED Smart Android TV ची विक्री करत असून, याची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा टीव्ही गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट सपोर्टसह येतो. यात २४ वॉटचा साउंड आउटपूट आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. वाचाः ची किंमत आणि फीचर्स स्वस्त फोनसाठी लोकप्रिय इनफिनिक्स एक्स १ ३२ इंच एचडी रेडी स्मार्ट टीव्ही आय केअर टेक्नोलॉजीसोबत येतो. याची किंमत १३,९९९ रुपये आहे. यात देखील गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट सपोर्टसह मिळेल. यात २० वॉटचा साउंडआउट आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. ची किंमत आणि फीचर्स Blaupunkt च्या या ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्राइड टीव्हीला १४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा टीव्ही गुगल असिस्टेंट आणि क्रोमाकास्ट इनबिल्टसह येतो. यात Netlix, Amazon, Disney+Hotstar, zee5 आणि sony liv अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. याचा साउंड ४० वॉटचा आहे. तर रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि पिक्सल रेट १९२०x१०८० आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k8YVGI