Full Width(True/False)

जिओच्या ‘या’ प्लानमध्ये ४ जण घेऊ शकतात लाभ; डेटा-कॉलिंगसह मिळेल ओटीटी सबस्क्रिप्शन मोफत

नवी दिल्ली : मोबाइल रिचार्जवर होणारा खर्च कमी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर Postpaid Plus Service एक चांगला पर्याय आहे. रिलायन्स जिओकडे ५ पोस्टपेड प्लान आहेत, ज्यात स्ट्रिमिंग अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड वॉयस कॉलिंगसह डेटा रोलओवरची सुविधा मिळते. हे जिओचे ९९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे पोस्टपेड प्लान आहेत. ९९९ रुपयांच्या प्लानचा घरातील ४ लोक लाभ घेऊ शकतात. या प्लानविषयी जाणून घेऊया. वाचाः जिओचा ९९९ रुपयांचा प्लान जिओच्या ९९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानची वैधता एक बिल साइकल आहे. यात एकूण २०० जीबी डेटा दिला जात असून, एकूण ५०० जीबी डेटा रोलओवरची सुविधा देखील मिळेल. विशेष म्हणजे यात कंपनीकडून तीन अतिरिक्त सिम कार्ड दिले जातात. म्हणजेच, ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ४ जणांचा खर्च निघेल. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. जिओच्या या प्लानमध्ये , आणि डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचाः जिओचा १,४९९ रुपयांचा प्लान या पोस्टपेड प्लानची वैधता एक बिल साइकल एवढी आहे. यात ग्राहकांना ३०० जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर प्रति जीबीसाठी १० रुपये मोजावे लागतील. यामध्ये ५०० जीबी डेटो रोलओवरची सुविधा देखील मिळते. हा फॅमिली प्लाननुसार, यात कोणतेही अतिरिक्त सिम कार्ड दिले जात नाही. जिओच्या १,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i6Pxkq