नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी ५५ इंच आणि त्यापुढील साइजच्या प्रीमियम स्मार्ट टीव्हींवर बंपर ऑफर देत आहे. ही ऑफर १५ जुलैला सुरू झाली असून, २० ऑगस्ट पर्यंत ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. देशभरातील प्रमूख इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडे या ऑफर्सचा लाभ घेता येईल. वाचा: कोणत्या मॉडेल्सवर ऑफर कंपनी Neo QLED and QLED TVs च्या ५५ इंचच्या पुढील आणि Crystal 4K UHD TVs च्या ७५ इंचच्या पुढील मॉडेल्सवर ऑफर देत आहे. ऑफर टीव्ही खरेदीवर १,०४,९९० रुपये किंमतीचे क्यू-सीरिज आणि ए-सीरिज साउंडबार मोफत देत आहे. यावर २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि १,९९० रुपये महिना ईएमआयची ऑफर देखील देत आहे. तसेच, QLED TVs वर २ वर्षांची वॉरंटी आणि १० वर्षांची नो स्क्रीन बर्न-इन वॉरंटी देत आहे. ग्राहकांना Neo QLED, QLED TV च्या ५५ इंचाच्या पुढील आणि ७५ इंच UHD TV च्या खरेदीवर १७,९०० रुपये किंमतीचे ए-सीरिज साउंडबार HW-A४५० किंवा २३,९०० रुपयांचे HW-A५५० मिळतील. हे टीव्हीच्या मॉडेलवर अवलंबून असेल. वाचा: जे ग्राहक Neo QLED आणि QLED TV चे ७५ इंचाच्या पुढील मॉडेल खरेदी करतील, त्यांना ५१,९०० रुपये किंमतीचा क्यू-सीरिज साउंड HW-Q८००A किंवा १,०४,९०० रुपयांचा क्यू सीरिज साउंडबार HW-Q९००A मिळेल. हे टीव्हीच्या मॉडेलवर अवलंबून असेल. Samsung Neo QLED या लाइनअपमध्ये क्वांटम मॅट्रिक्स टेक्नोलॉजीसह Neo Quantum प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्ही सीरिजमध्ये देण्यात आलेली क्वांटम मॅट्रिक्स टेक्नोलॉजी अचूक लाइटिंगचा वापर करत पिक्चर ब्लूमिंग कमी करेल. टीव्ही Neo Quantum प्रोसेसरसोबत येतात. यात आधुनिक AI Upscaling टेक्नोलॉजी फीचर देण्यात आले आहे. १६ न्यूरल नेटवर्क्सकडून जमा झालेल्या डेटाद्वारे स्पष्ट रिझॉल्यूशन आणि इमेज क्वालिटीसाठी याचा फायदा होतो. २०२१ Neo QLED टीव्ही हे ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड प्रो (OTS Pro) टेक्नोलॉजी, क्यू-सिम्फोनी आणि इतर दमदार ऑडिओ फीचर्ससह येतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i9wGVW