मुंबई- राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि अनेक सिनेमे- मालिकांमधून लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी, १६ जुलै २०२२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरेखा सिक्री ७५ वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. सुरेखा यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. सुरेखा यांना दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांचे मॅनेजर विवेक सिधवानी यांनी माध्यमांना सांगितले की, 'तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. यापूर्वी त्यांना दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोक आला होता.' सुरेखा सिक्री यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पहिला ब्रेन स्ट्रोक आला होता. काही दिवस इस्पितळात ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते. सुरेखा सिक्री यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे पदवी संपादन केली होती. 'तमस', 'मम्मो' आणि 'बधाई हो' या सिनेमांसाठी त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार व्यतिरिक्त सुरेखा यांना १९८९ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. सुरेखा यांनी अनेक सिनेमे आणि नाटकांत काम केले असले तरी टीव्हीवरील 'बालिका वधू' मालिकेतील त्यांच्यां पात्राने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. प्रत्येक घरात त्यांचा चेहरा ओळखला जाऊ लागला. त्यांच्या भूमिकेचं भरपूर कौतुक करण्यात आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kldoQd