Full Width(True/False)

प्रियांका चोप्रानं केली होती स्वतःची आई आणि पतीची हेरगिरी, वाचा नेमकं काय घडलं

मुंबई: बॉलिवूडची देसी गर्ल आणि सध्याची ग्लोबल स्टार आज ३९ वर्षांची झाली आहे. जागतिक स्तरावर प्रियांकाचा फार मोठा चाहता वर्ग आहे. प्रियांका चोप्रानं २०१८ साली अमेरिकन गायक निक जोनसशी लग्नगाठ बांधली. आज प्रियांका आणि निक अनेकांना कपल गोल्स देताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दोघंही एकमेकांच्या किती प्रेमात बुडाले आहेत हे लक्षात येतं. पण त्यांच्या लग्नाच्या आधी जेव्हा तिच्या आईला भेटायला भारतात आला होता. त्यावेळी मात्र प्रियांकानं स्वतःची आई आणि निक जोनस यांची हेरगिरी केली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडीचे आज असंख्य चाहते असले तरीही फार कमी लोकांना माहीत आहे की, प्रियांकानं निकसोबत पहिल्या डेटवर जाण्यास सुरुवातीला नकार दिला होता. निकनं २०१७ साली प्रियांकाला व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या फेअरवेल पार्टीमध्ये चलण्यासाठी सांगितलं होतं. प्रियांका त्यावेळी वेब सीरिज क्वान्टिकोचं शूटिंग करत होती आणि तिनं निकसोबत जाण्यास नकार दिला होता. प्रियांकानं सांगितलं, पहिल्यांदा मेट गालामध्ये एकत्र दिसल्यानंतर तिनं निकसोबत काही वेळ घालवला होता. पण त्यावेळी प्रियांका तिच्या आणि निकच्या वयात असलेल्या १० वर्षांच्या फरकाचा विचार करत होती. त्यावेळी प्रियांका ३५ वर्षांची होती. तर निकचं वय केवळ २५ वर्षं होतं. पण नंतर या दोघांचं प्रेम वयातील या फरकावर भारी पडलं. निक जोनसला प्रियांका सुरुवातीला ड्रिंक्ससाठी भेटली होती. ही भेट मेट गालाच्या या दोघांच्या पहिल्या अपियरन्सच्या काही वेळ अगोदर झाली होती. त्यानंतर प्रियांकानं निकसोबत काही वेळ व्यतित केला. काही काळ डेट केल्यानंतर प्रियांकानं निकला भारतातील आपल्या घरी बोलावलं होतं. प्रियांका जेव्हा निकला भारतात घेऊन आली होती. तेव्हा तिनं याची माहिती आपल्या आईला दिली नव्हती. अशात प्रियांकाची आई निकला पहिल्यांदा नाइट गाऊनमध्ये भेटल्या होत्या. प्रियांकानं सांगितलं, 'जेव्हा निक जोनस पहिल्यांदा भारतात आला होता. तेव्हा मी माझ्या कामामुळे बाहेर होते आणि निकनं माझ्या आईला लंचसाठी नेण्याचा प्लॅन केला होता. मला समजेना याला माझ्या आईसोबत नेमकं काय बोलणार आहे. त्यामुळे मी माझ्या सेक्युरिटी टीममधील एका व्यक्तीला तिकडे काय चाललं आहे याचे फोटो पाठवायला सांगितले होते. थोडक्यात मी त्यांची हेरगिरी केली होती. नंतर मला समजलं की, निकनं त्यावेळी माझ्या आईकडे मला लग्नासाठी मागणी घातली होती.' प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी १ डिसेंबर २०१८ साली जोधपूरमध्ये लग्न केलं होतं. ३ दिवसांच्या या लग्नसोहळ्याला फक्त जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. हे दोघंही हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्नाच्या बेडीत अडकले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zaToDX