मुंबई: बिग बॉस फेम आणि येत्या १६ जुलैला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लग्नाआधीच्या सर्व विधींनी सुरुवात झाली असून काल दिशाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यासोबतच राहुल वैद्यचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. बुधवारी दिशाच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी तिच्यासोबत राहुल आणि त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होतं. दिशाच्या मुंबई फोर्ट येथील बंगल्यात नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दिशाच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये दिशा आणि राहुल खूपच खूश दिसत आहेत. या दोघांनीही त्यांच्या मैत्रिणींसोबत फोटोग्राफर्सना पोझ दिली. याशिवाय फोटोग्राफर विरल भयानी यांनी राहुलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सर्वजण राहुलला दिशासाठी गाणं गाण्यासाठी आग्रह करताना दिसत आहे. त्यानंतर राहुल दिशासाठी '' गाणं गाताना दिसत आहे. सोबतच हे दोघंही डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर सर्व फोटोग्राफर्सचे या दोघांनीही आभार मानले. दरम्यान दिशानंही तिच्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तयार होऊन मेहंदीसाठी बसलेली दिसत आहे. दिशाला मेहंदी लावताना दिसत आहे. या कार्यक्रमासाठी दिशानं पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय राहुल आणि दिशाच्या संगीत रिहर्सलचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल आणि दिशाच्या लग्नात केवळ ५० लोक सहभागी होणार असल्याचं त्यानं अलिकडच्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UPlhCM