Full Width(True/False)

अभिनेता म्हणाला 'मी जिवंत आहे', यूट्यूबने दिलं अजबच उत्तर

मुंबई- '' चित्रपटात झळकणारा दाक्षिणात्य अभिनेता सध्या स्वतःच्याच मृत्यूच्या बातम्यांनी वैतागला आहे. एक ट्वीट करत सिद्धार्थने चाहत्यांना घडलेला प्रकार सांगितला. सिद्धार्थ जिवंत असूनही त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. याबद्दल त्याने ट्वीटमध्ये निराशा व्यक्त केली. यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा या संदर्भांत यूट्यूबकडे तक्रार करूनही यूट्यूबने त्या व्हिडीओविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये यूट्यूब व्हिडिओचा एक स्क्रिनशॉट शेअर करत चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली. सिद्धार्थने लिहिलं, 'व्हिडिओत म्हंटलं आहे की, माझा मृत्यू काही वर्षांपूर्वीच झाला आहे. या व्हिडिओबद्दल मी यूट्यूबकडे तक्रारदेखील केली आहे. परंतु, यूट्यूबकडून मला अजबच उत्तर मिळालं. यूट्यूब म्हणतंय की, आम्हाला या व्हिडिओत कोणतीही चूक आढळून आलेली नाही.' सिद्धार्थने उल्लेख केलेल्या व्हिडिओत अशा कलाकारांबद्दल माहिती देण्यात आली आहे ज्याचा मृत्यू तरुणपणी झालेला आहे. यात सिद्धार्थचंदेखील नाव आहे. घडल्या प्रकारावर नेटकऱ्यांनीही सिद्धार्थच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर यूट्यूब आपली चूक सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थने 'रंग दे बसंती' सोबत 'चश्मेबद्दूर' या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. सिद्धार्थ शेवटचा २०१९ सालच्या 'आरुवं' या दाक्षिणात्य चित्रपटात झळकला होता. लवकरच सिद्धार्थ आणखी काही चित्रपटात झळकणार आहे. त्यात 'इंडियन २', 'टक्कर', शैतान का बच्चा' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BhlGyv