मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेकविध भूमिकांमधून अभिनयाचा मानदंड स्थापित करणारे, चित्रपटसृष्टीवर अक्षय मुद्रा उमटवणारे, ‘ट्रॅजेडी किंग’ अशी उपाधी लागलेले, सार्वकालिक श्रेष्ठ अभिनेते (वय ९८) यांचं प्रदीर्घ आजारानंतर ७ जुलै २०२१ रोजी निधन झालं. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण त्यांच्या संपत्तीसंदर्भात व्हायरल पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. पण व्हायरल होण्याऱ्या पोस्ट ही फेक असल्याचं आता समोर आलं आहे. सोशल मीडियावर दिवंगत दिलीप कुमार यांच्या संदर्भात पोस्ट व्हायरल होत आहे. 'मुहम्मद यूसुफ उर्फ दिलीप कुमार यांच्यासाठी रडणाऱ्यांनो जरा डोळे उघडा...त्यांनी त्यांची ९८ कोटींची संपत्ती वक्फ बोर्डाला दिली आहे, मंदिरांसाठी काहीच दिलं नाहीए', अशी वादग्रस्त पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. पण सत्य काही वेगळंच!व्हायरल पोस्ट मागचं सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. दिलीप कुमार यांनी त्यांची संपत्ती वक्फ बोर्डाला दिल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. व्हायरल पोस्ट खोट्या आणि चुकीच्या असल्याचं त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Bhtv7b