नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे कोणतीही गोष्ट करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच मानवाच्या जीवनात देखील अमुलाग्र बदल घडत आहे. आता चक्क ३डी प्रिटिंगद्वारे शाळेची निर्मिती करण्यात आल्याचे समोर आले होते. तेही फक्त १८ तासात. यामुळे शिक्षण क्षेत्रात नक्कीच बदल घडण्यास मदत होऊ शकते. वाचा: शाळेची कमतरता दूर करण्यासाठी टेक्नोलॉजीच्या मदतीने नावाच्या एका अफ्रिकन अफोर्डेबल हाउसिंग वेंचरने या देशात जगातील पहिले उभारले आहे. हे डिझाइन त्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरेल ज्यांच्याकडे शिक्षणासाठी शाळांची सुविधा नाही. यूनिसेफनुसार, प्राथमिक शाळांची कमतरता दूर करण्यासाठी मलावीला ३६ हजार नवीन वर्गांची गरज आहे. ही मागणी पुर्ण होण्यासाठी ७० वर्ष लागू शकतात. १४ट्रीजचे म्हणणे आहे की, ३डी प्रिंटिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने ही समस्या १० वर्षात सोडवता येईल. ही ३डी मलावीच्या सलीमा जिल्ह्यात उभारण्यात आली आहे. भिंती उभारण्यासाठी १८ तास लागले. त्यानंतर ३डी-प्रिंटेड शाळेला याम्बे भागातील एका ग्रामीण क्षेत्रात हलवण्यात आले. मलावीमधील एक प्राथमिक शिक्षण सल्लागार जुलियान कुफांगा चिकंदिला बोलताना म्हणल्या की, ‘आधी याम्बे क्षेत्रात १२ शाळा होत्या. आता नवीन ३डी-प्रिंटेड स्कूलमुळे याची संख्या १३ झाली आहे. मुलांच्या शिक्षणात वाढ करण्यासाठी आम्हाला आणखी ४ प्रायमरी शाळांची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यानुसार, गरजूंच्या सेवेसाठी जवळपास ५० शाळांची आवश्यकता आहे. नवीन इमारतीने प्रभावित झाले असून, याचे स्थान आणि डिझाइन विद्यार्थ्यांना त्या सुविधा देईल ज्या आधी नव्हत्या. शिकवणे आणि शिक्षण घेणे हे आता क्लासरूमच्या बाहेर आणि आत देखील करता येईल.’ वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SSLy2e