मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी एक गोड बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दुसऱ्यांदा पालक होण्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलाय. नेहा धुपियानं आज मुलाला जन्म दिला. जुलै महिन्यात एक खास फोटू शेअर करत नेहानं ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नेहा आणि अंगद यांना मेहेर (Mehr Dhupia Bedi)ही तीन वर्षांची मुलगी आहे. घरी चिमुकल्याचं आगमन झाल्यानं सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. अंगदनं एक खास पोस्ट शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केलाय. 'देवाच्या आशिर्वादानं आज आम्हाला पुत्रप्राप्ती झाली आहे. नेहा आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. असं अंगदनं म्हटलं आहे. गरोदर असताना नेहानं अनेक फोटोशूट केले होते. सोशल मीडियावर ते फोटो व्हायरलही झाले होते. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ४१ वर्षीय नेहानं २००२ मध्ये मिस इंडियाचं विजेतेपद जिंकलं होतं. यानंतर २००३ मध्ये तिनं 'कयामत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नेहानं १० मे २०१८ रोजी अंगद बेदीशी लग्न केलं. नेहा आणि अंगदची पहिली मुलगी मेहरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मेहरचा जन्म झाला. ती अखेर काजोलच्या 'हेलिकॉप्टर ईला' सिनेमात दिसली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZNhKap