Full Width(True/False)

आकर्षक आणि वेगळ्या डिझाईनसह Nothing Ear 1 इयरबड्स लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली. वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी वनप्लस नंतर Nothing नावाची कंपनी स्थापन केली. त्याच कंपनीचे चे पहिले प्रोडक्ट बाजारात दाखल करण्यात आले आहे . Nothing Ear 1 ची नोटिंग किंमत ५, ९९९ रुपये असेल आणि ग्राहक ते ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर खरेदी करू शकतील. असतील. लाँचिंगच्या वेळी, सीईओ आणि नथिंगचे सह-संस्थापक कार्ल पे यांनी सांगितले की, ग्राउंड ब्रेकिंग डिझाइन असलेले Nothing Ear 1 बाजारपेठेमध्ये एक वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. वाचा: Nothing Ear 1 मध्ये असून हे डिव्हाईस ३४ तासांचा प्ले टाईम देईल. असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने Nothing Ear 1 च्या डिझाइनवर बरेच काम केले आहे आणि ते इतर टीडब्ल्यूएस इअरबड्सपेक्षा वेगळे दिसत आहे. यातील पारदर्शी डिझाइन त्यालाल भिन्न बनवते. इयरफोनमध्ये मायक्रोफोन, मॅग्नेट आणि सर्किट बोर्ड स्थापित आहे. यात लाल सिग्नल लाइट देखील आहे. चांगल्या आवाजासाठी, कंपनीने त्यात ११.६ मिमी ड्राइव्हर्स दिले आहेत जे ब्लूटूथ ५.२ समर्थित आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार Active नॉइस कॅन्सलेशनमध्ये तीन हाय डेफिनेशन मिक्स वापरण्यात आले आहेत. या इअरबड्ससह युजर्स भिन्न मोड निवडू शकतात. लाइट मोड आणि मॅक्स मोडच्या पर्यायाशिवाय ट्रान्सपरेन्सी मोड देण्यात आला आहे. कंपनीने यात क्लियर व्हॉईस तंत्रज्ञान वापरले आहे. हे Android डिव्हाइससह त्वरित जोडले जाईल. म्हणजेच, Earphones जोडीला येताच अँड्रॉइड वापरकर्त्यांकडे स्क्रीनवर पेअरिंग करण्याचा पर्याय असू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे इअरबड्स ७. ७ तास म्युझिक प्लेबॅक बॅकअप देतील. चार्जिंग चा ३४ तासांपर्यंत बॅकअप घेतला जाऊ शकतो. १० मिनिटांच्या चार्जींगवर डिव्हाईस ८ तासांसाठी वापरले जाऊ शकते. असे कंपनीचे म्हणणे आहे. हे इअरबड्स वायरलेस चार्जिंगला समर्थन देतात आणि हे कनेक्ट करण्यासाठी, कंपनीने ear 1 App बनविले आहे जे तुम्ही Google Play Store आणि Apple अ‍ॅप स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zL03VU