म.टा. प्रतिनिधी, कोल्हापुरातील कलेचे माहेरघर असलेल्या शालिनी आणि वाचण्यासाठी आणि इतर अनेक रंगकर्मींनी आज आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनाची पहिली पायरी म्हणून आज मूक आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील शालिनी स्टुडिओच्या जागेवर रेखांकन करण्यास परवानगी देण्यात आलेला आदेश सरकारने मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच जयप्रभा स्टुडिओ चा परिसर हेरिटेज असल्याने तेथे बांधकामाला परवानगी देऊ नये यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात बांधकामासाठी रेखांकन मंजुरी देण्यात आली. हा आदेश तात्काळ मागे घ्यावा यासाठी रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे. सकाळी महामंडळाचे पदाधिकारी व अनेक रंगकर्मी यांनी मूक आंदोलन केले. शालिनी स्टुडिओ वाचवा, जयप्रभा स्टुडिओ वाचवा, रेखांकन आदेश मागे घ्या असे मागणीचे विविध फलक घेऊन आंदोलकांनी आपल्या मागण्या सरकारला कळवल्या. स्टुडिओ वाचवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. त्याचे वाचन संग्राम भालकर यांनी केले. सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी बिंदू चौकात लाक्षणिक उपोषण व कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे . या आंदोलनात महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, अजय कुरणे, राहुल राजशेखर, अर्जुन नलवडे, बबीता काकडे, अमर मोरे यांच्यासह अनेकांनी भाग घेतला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w6ssDq