Full Width(True/False)

मोबाइल विना Ola किंवा Uber वरून Cab बुक करा, खूपच सोपी आहे ट्रिक्स

नवी दिल्लीः Book an Uber or Ola Cab Without the App: कॅब बुक करण्यासाठी नेहमी आपल्या खिशातील मोबाइल काढावा लागतो. त्यानंतर उबर किंवा ओला अॅप ओपन करून कॅब बुकिंग करावी लागते. परंतु, तुम्ही आता ऑफिसमधील आपल्या पीसीसमोर बसलेले असाल तर तुम्ही कॅब बुक करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त वेब ब्राउजरचा उपयोग करावा लागेल. कम्प्यूटर वरून कॅब बुक करणे वास्तविक सोपे आहे. वाचाः फोनच्या अॅप विना उबरवरून बुक करा फोन विना उबर बुक करणे सोपे आहे. परंतु, आणखी एक स्टेप आहे जी आवश्यक आहे. कारण, डेस्कटॉप वर उबल वेबसाइट तुम्हाला कॅब बुक करण्याची सुविधा देत नाही. यासाठी तुम्हाला मोबाइल वेबसाइटचा उपयोग करावा लागेल. वाचाः >> आपल्या पीसीवरील ब्राउजर ओपन करा त्यानंतर m.uber.com वर जा. >> स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर आणि आपला पासवर्ड द्या. >> यानंतर तुम्हाला आपल्या फोनवर एक ओटीपी मिळेल. याची नोंद करून बुकिंग पेजवर जावू शकता. त्यानंतर बुकिंग केल्यास तुम्हाला आवश्यक डिटेल्स मागितली जाणार नाही. >> एकदा साइन केल्यानंतर तुम्हाला यूज लोकेशन सर्विस संबंधी विचारले जाईल. त्याला इनेबल केल्यानंतर बुकिंग स्क्रीनवर येईल. >> या ठिकाणी आपला पिकअप आणि ड्रॉप लोकेशन नोंदवा. >> त्यानंतर तुम्हाला खाली मॅप दिसेल. कॅप पर्याय, भाडे, पिकअपची वेळ सांगितली जाईल. त्याला सिलेक्ट केल्यानंतर रिक्वेस्ट बटन दाबा. >> यानंतर उबर तुम्हाला कॅब बुक करून देईल. विना फोन अॅप ओला बुक करा >> आपल्या पीसीवर, ब्राउजरला ओपन करा. त्यानंतर www.olacabs.com वर जा. >> उजवीकडच्या बॉक्समध्ये आपला पिकअप आणि ड्रॉप स्थान नोंद करा. >> नंतर सर्च कॅब्सवर क्लिक करा. >> तुम्हाला कारची एक यादी मिळेल. ज्यात किंमत आणि पिकअपची वेळ मिळेल. >> पेमेंट ऑप्शनमध्ये कॅश पेमेंट दिसेल. प्रॉम्प्ट मध्ये आपला फोन नंबर टाका. >> तुम्हाला आपल्या फोनवर एक ओटीपी मिळेल. तो या ठिकाणी नोंद करा. >> त्यानंतर तुमची कॅब बुक होईल. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hMk5ZL